नवी दिल्ली - आधार कार्ड आणि पॅन एकमेकांना संलग्न केल्यानंतर आता हे आधार कार्ड भ्रष्ट अधिकाºयांचा घोटाळा बाहेर आणू शकेल. तसे विशेष सॉफ्टवेअर तयार होत असल्याची माहिती केंद्रिय दक्षता आयुक्त के.व्ही. चौधरी यांनी दिली.विविध वित्त व्यवहारांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्याआधारेच प्रशासनातील भ्रष्ट अधिकाºयांच्या बेहिशेबी मालमत्ता हुडकून काढण्याची मोहिम केंद्रिय दक्षता आयुक्तालय हाती घेत आहे.विभागाने यासंबंधीचा आराखडा तयार केला आहे. एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. एखाद्या अधिकाºयाची माहिती काढायची असल्यास सर्व विभागांकडून आवश्यक ती माहिती त्याआधारे तात्काळ मिळवता येईल. स्थावर मालमत्ता व शेअर्स खरेदीसारख्या वित्त व्यवहारांची माहिती ही प्राप्तीकर खाते, मालमत्ता नोंदणी विभाग, मुद्रांक शुल्क, सेबी यांच्याकडे असते. आता ‘आधार’ सर्वच ठिकाणी अनिवार्य केल्यास या सर्व विभागांकडून अशा वित्त व्यवहारांची माहिती विना विलंब मिळविता येईल, असे चौधरी यांनी सांगितले.तपास होईल सोपासीबीआय आणि अन्य तपास विभागांकडे याआधी अशा प्रकारे थेट माहिती मिळविण्याची साधनेच नव्हती, पण घोटाळ्यांच्या तपासासाठी ही माहिती मौल्यवान असते. आता मात्र तशी प्रणाली विकसित केली जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून काही परवानग्याही घ्याव्या लागतील, असे चौधरी यांनी सांगितले.
पैसे खाणाऱ्या अधिका-यांना पकडेल ‘आधार’, तयार होतेय विशेष सॉफ्टवेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:23 AM