ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - एलपीजी गॅस सिलिंडरची सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला आता आधार कार्ड द्यावं लागणार आहे. आधार कार्ड नसलेल्या ग्राहकांना एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार नाही. आधार कार्ड नसलेल्या व्यक्तींना तात्पुरत्या स्वरुपात सबसिडी मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागणार असून, 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी आधार कार्ड न काढल्यास त्यांना सबसिडी मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत. नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम मंत्रालयानं तेल कंपन्यांनाही तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. तेल कंपन्यांनी सबसिडीसाठी पात्र असणा-या पण आधार कार्ड नसलेल्या ग्राहकांसाठी नोंदणी करण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहन चालक परवाना, व्होटर आयडी कार्ड, रेशन कार्ड द्यावे लागणार आहे.मात्र तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या पुराव्यासह आधार कार्डसाठी नोंदणी करावी लागणार आहे. आधार कार्ड नसलेल्या ग्राहकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, त्यानंतरही त्यांनी आधार कार्ड न काढल्यास त्यांना एलपीजी गॅसवर सबसिडी मिळणार नाही, असा आदेश नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम मंत्रालयानं काढला आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरची सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे
By admin | Published: October 04, 2016 9:49 PM