शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

'भाजपाचा गड भेदण्यात यश, पुढील निवडणुकीत...'; अरविंद केजरीवालंचा दावा, नागरिकांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 5:35 PM

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीतील महापालिका निवडणुकीत मोठ्या विजय मिळविल्यानंतर, आता दुसऱ्याच दिवशी आणखी एक विक्रम केला आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याच बरोबर देशातील राष्ट्रीय पक्षांचा आकडा वाढून आता ९ वर पोहोचेल.

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने आतापर्यंत जवळपास १३ टक्के मते मिळविली आहेत. याच बरोबर आता आप गुजरातमध्ये एक प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षही बनला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, देशातील नागरिकांना मनापासून धन्यावद, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. आज आपली आम आदमी पार्टी एक राष्ट्रीय पार्टी झाली आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. १० वर्षांआधी आम आदमी पार्टी खूप लहान होती. मात्र आता याच पार्टीचे देशातील दोन राज्यात सरकार आहे. गुजरातमधील नागरिकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, मला खूप काही शिकायला मिळालं. गुजरात भाजपाचा गड मानला जात असून तो भेदण्यात आम्हाला यश मिळालं आहे. पुढील वेळी तो जिंकू, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी बोलावून दाखवला. आम्ही प्रचारात कधीही कोणावर आरोप केले नाही, शिवीगाळ केली नाही. आम्ही फक्त कामासंदर्भात प्रचार केल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. 

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी महत्वाच्या अटी - 

कुठल्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागत असतात. 

  • जर एखाद्या पक्षाने चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा मिळवला तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
  • जर एखाद्या पक्षाने तीन राज्य मिळून लोकसभेत तीन टक्के जागा मिळवल्या तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
  • जर एखाद्या पक्षाने चार लोकसभा जागांशिवाय संसदीय अथवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळविली तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
  • जर एखाद्या पक्षाने वरील पैकी कुठल्याही तीन अटींपैकी एक अट पूर्ण केल्यास, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. 

देशात एकूण किती राष्ट्रीय पक्ष -

निवडणूक आयोगानुसार देशात, काँग्रेस, भाजप, बीएसपी, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय, सीपीआयएम आणि एनपीपी हे आधीपासूनच राष्ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला २०१९ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आधीच राज्य स्थरीय अथवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ६.८ टक्के मते मिळाली आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीElectionनिवडणूकGujaratगुजरात