शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

"...तर आम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानात निवडणूक लढणार नाही", 'आप'ची कॉंग्रेसला ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 2:02 PM

AAP offer to congress : दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने कॉंग्रेसला एक मोठी ऑफर दिली आहे.

नवी दिल्ली : दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने कॉंग्रेसला एक मोठी ऑफर दिली आहे. जर कॉंग्रेस पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवली नाही तर आम्ही देखील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे आम आदमी पक्षाने सांगितले आहे. 'आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी कॉंग्रेसची कोंडी करताना म्हटले की, त्यांनी दिल्ली आणि पंजाबच्या निवडणूकीत उमेदवार उभे केले नाहीत, तर आम्ही देखील मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्यांना सहकार्य करू अर्थात तिथे निवडणूक लढणार नाही.

'आप'ने दिलेल्या या ऑफरमुळे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची कोंडी झाल्याचे दिसते. कारण आताच्या घडीला कॉंग्रेससोबत आम आदमी पार्टी देखील केंद्रातील सत्ताधारी भाजपविरूद्ध लढाई लढत आहे. राजधानी दिल्लीत एका सभेला संबोधित करताना 'आप'चे प्रवक्ते भारद्वाज यांनी म्हटले, "कॉंग्रेस पक्षाला दिल्लीत २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे जर कॉंग्रेसने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही देखील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीतून माघार घेऊ."

तसेच कॉंग्रेस आम आदमी पार्टीच्या घोषणापत्राची चोरी करत असल्याचा आरोप देखील 'आप'ने केला. "कॉंग्रेस देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे, पण ते आज सी-सी, कॉपी-कट-कॉंग्रेस झाली आहे. ते अरविंद केजरीवाल यांच्या भूमिका, अजेंडा याची चोरी करत आहेत. त्यांना स्वत:चे काहीच माहिती नाही. तसेच आता हे देखील समोर येत आहे की, कॉंग्रेसमध्ये केवळ नेतृत्वाची कमी नसून विचारांचा देखील अभाव आहे", अशा शब्दांत सौरभ भारद्वाज यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

कॉंग्रेसवर घोषणापत्र चोरी करण्याचा आरोप कॉंग्रेसवर घोषणापत्र चोरी करण्याचा आरोप करताना 'आप'ने म्हटले, "याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आज देशातील सर्वात जुनी पार्टी आम आदमी पार्टीचे घोषणापत्र चोरत आहे. अरविंद केजरीवाल यांनी आमच्या घोषणापत्राचे महत्त्व पटवून दिले. कॉंग्रेसने 'आप'च्या मोफत वीज या योजनेची खिल्ली उडवली होती. पण आता ते दुसऱ्या राज्यांमध्ये हेच सांगून जनतेसमोर जात आहेत. आमच्या मोफत वीज या अभियानाची त्यांनी खिल्ली उडवली पण हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी ३०० युनिट वीज मोफत देणार असल्याचा वादा केला."

दरम्यान, २३ मे पासून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी देशव्यापी दौरा केला. 'आप'ने ११ मे रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर या अध्यादेशाविरोधात मेगा रॅली देखील काढली होती.

टॅग्स :AAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाबdelhiदिल्लीPoliticsराजकारण