AAP: आम आदमी पक्षाला धक्का, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:24 PM2022-05-24T19:24:48+5:302022-05-24T19:25:38+5:30
कर्नल अजय कोठियाल यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले.
डेहराडून: आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कर्नल अजय कोठियाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अजय कोठियाल यांनी मंगळवारी डेहराडूनमध्ये मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. अजय कोठियाल यांनी काही दिवसांपूर्वी आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
Uttarakhand | AAP's CM candidate for recently concluded Assembly elections Ajay Kothiyal joins BJP in the presence of CM Pushkar Singh Dhami in Dehradun. pic.twitter.com/ZbooDyNLei
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 24, 2022
कोठियाल यांनी थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. कोठियाल यांनी 'आप'च्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासोबतच आम आदमी पक्षाचे कार्याध्यक्ष भूपेश उपाध्याय यांनीही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाच्या धोरणांवर नाराज होऊन भूपेश उपाध्याय यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
गंगोत्रीमधून पराभव झाला
या वर्षी झालेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत कर्नल अजय कोथियाल यांनी गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून आपच्या तिकिटावर नशीब आजमावले. मात्र, यात त्यांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीत त्यांना केवळ 6161 मते मिळाली, जी एकूण मतांच्या केवळ 10.33 टक्के होती.