शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
2
"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं
3
"पहिल्याच नजरेत प्रेम, लग्न, घर, मुलं..."; शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा भावूक करणारा Video
4
Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
5
जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर
6
पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण-कसारा रेल्वे सेवा ३ तासांपासून ठप्प
7
MS Dhoni Birthday : माहीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मध्यरात्री घरी गेला सलमान खान, धोनीसाठी केली खास पोस्ट, म्हणतो...
8
"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं
9
Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना
10
Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद
11
धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मन आनंदी राहील, जास्त भावुक व हळवे व्हाल!
13
लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!
14
"संघात वारंवार बदल करणे पसंत नव्हते!"; रोहितसाठी सहायकाच्या भूमिकेत असल्याचे राहुल द्रविडचे मत
15
"अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला"; राहुल गांधींचे विधान
16
डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर
17
‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम
18
अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल
19
चौगुले समूहावर ईडीची छापेमारी; १९ हजार कोटी पाठवले परदेशी
20
संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

AAP: आपचे काँग्रेसशी जागा वाटप करण्याचे संकेत, विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी भूमिकेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 8:23 AM

AAP & Congress : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर जागा वाटपास तयार असल्याचे संकेत आप पक्षाने दिले आहेत. काँग्रेसला कोणतेही सहकार्य करणार नाही, ही आपली आधीची भूमिका आपने बदलली आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर जागा वाटपास तयार असल्याचे संकेत आप पक्षाने दिले आहेत. काँग्रेसला कोणतेही सहकार्य करणार नाही, ही आपली आधीची भूमिका आपने बदलली आहे. विरोधी पक्षांची आघाडी होण्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून आपने हा पवित्रा घेतला आहे.

दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सात लोकसभा जागांपैकी तीन जागा आप सोडण्यास तयार आहे. मात्र, त्याबदल्यात काँग्रेसने पंजाब व आणखी काही राज्यांमध्ये तडजोडीची भूमिका स्वीकारली पाहिजे, अशी आपची मागणी आहे. २०१९ च्या निवडणुकांत पंजाबमध्ये काँग्रेसने आठ जागांवर, तर आपने फक्त एका जागेवर विजय मिळविला होता. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांत आप दणदणीत विजय मिळवून सत्तेवर आला. त्यामुळे पंजाबमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागा लढविण्याचा आपचा विचार आहे. या मुद्यावर काँग्रेसशी चर्चा करून तोडगा काढण्यास अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या खरगे संपर्कातn २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत समविचारी पक्षांची आघाडी व्हावी यासाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रयत्नशील आहेत. त्यांनी याआधी सांगितले होते की, आप व काँग्रेस यांची स्वत:ची काही मते आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न आहे. n विरोधी पक्षांची आघाडी व्हावी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे देखील विविध नेत्यांशी चर्चा करीत आहेत.

टॅग्स :AAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल