शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
3
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
4
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
5
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
6
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
7
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
8
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
9
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
10
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
11
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
12
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
13
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
14
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
16
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
17
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
18
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
19
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
20
शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर, बुलढाणा मधील दोनही विद्यमान आमदारांना मिळाली पुन्हा संधी

केजरीवालांनी सांगितला चीनला धडा शिकवण्याचा 'मास्टर प्लान'; म्हणाले...गॅरंटी देतो की...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 6:55 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरुन भाजपाला घेरलं आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरुन भाजपाला घेरलं आहे. त्यांनी देशातील लोकांना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. केजरीवाल म्हणाले की चीनच्या आयातीचा मुद्दा देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला वेदना देणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्याकडे डोळे वटारुन पाहात आहे. आता छोटे छोटे वार करुन काही उपयोग नाही असं सांगत केजरीवाल यांनी यावेळी चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा मास्टर प्लान सांगितला. 

"भारतीय जवान चीनच्या आगळीकीला जशास तसं उत्तर देत आहेत. काही जवानांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मग हेही ऐकू येतं की चीन भारतीय सीमेत काही किलोमीटर आत शिरला आहे. भारत सरकार म्हणतं सारंकाही ठिक आहे. मग मीडियात बातम्या येतात की सीमेवर सारंकाही आलबेल नाही. एका बाजूला चीन मोठ्या हिमतीनं चीनी सैनिकांचा मुकाबला करत आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

भाजपावर केला हल्लाबोल"केंद्र सरकार आणि भाजपावाले चीनला उत्तर देण्याऐवजी चीनला डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याऐवजी बक्षिसांचा वर्षाव होत आहे. भारतानं चीनकडून ६५ बिलियन डॉलरचं सामान खरेदी केलं आहे. केंद्राचा असा कोणता नाईलाज झाला आहे की चीनला इतका मोठा व्यवसाय दिला जात आहे. चीनहून चप्पल, खेळणी आणि कपडे आयात केले जातात. हे सामान तर भारतातही तयार केलं जाऊ शकतं", असं केजरीवाल म्हणाले. 

९० टक्के वस्तूंचं भारतातच उत्पादन करता येईलकेजरीवाल म्हणाले, भारतीय जनता पक्षाला माझं आवाहन आहे की असं स्वत: गहाण टाकण्याचं काम करू नका. चीनसमोर झुकू नका. ज्या दिवशी आपण चीनच्या वस्तू बॉयकॉट करणं सुरू करू तेव्हाच चीनला त्यांची औकात लक्षात येईल. चीनहून आयात केल्या जाणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक वस्तू भारतातही उत्पादित केल्या जाऊ शकतात. भारताची परिस्थिती सध्या इतकी वाईट करुन ठेवलीय की मोठ-मोठे उद्योगपती देश सोडून जात आहेत"

गेल्या पाच ते सात वर्षात १२.३० लाख लोक भारत सोडून गेले आहेत. इथं कुणालाच काम करू दिलं जात नाही. मोठ-मोठे व्यापारी देश सोडून जात आहेत. खोट्या केसेस दाखल करुन सर्वांना ठेच पोहोचवली जात आहे. चोरांना आपल्या पक्षात सामील करुन घेतलं जातं आणि जे इमानदारीनं काम करु इच्छित आहेत ते मागे पडत आहेत, असंही केजरीवाल म्हणाले. 

चीनचा स्वस्त माल नको"चीनला आपल्या सैनिकांच्या जीवाची अजिबात किंमत नाही. चीन स्वस्त माल देतो असं सांगितलं जातं. पण आपल्याला स्वस्त माल नको. आम्ही भारताचा माल खरेदी करू मग तो कितीही बनू देत", असं केजरीवाल म्हणाले. त्यांनी यावेळी मेक इन इंडियावर जोर दिला आणि भारतातील जनतेला कट्टर देशभक्त देखील म्हटलं. "भारतातील लोक कट्टर देशभक्त आहेत. आम्हाला चीनचा स्वस्त माल नको. आम्ही भारतात तयार झालेलाच माल खेरदी करू मग तो चीनच्या तुलनेत दुप्पट किमतीला का असेना. पण चीनहून माल आयात करणं थांबवा. देशातील जनतेलाही मला आवाहन करायचं आहे की चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका", असंही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल