नवी दिल्ली : नायब राज्यपालांसोबत अधिकार क्षेत्राचा वाद विकोपाला पोहोचला असतानाच राजधानीतील आम आदमी पार्टीचे (आप) सरकार आणि दिल्ली पोलिसांतही आता ‘जंग’ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या २१ आमदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे.पक्षाचे दोन वरिष्ठ मंत्री यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात अडकले असून या कारवाईने आपच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.ज्या २५ प्रकरणांमध्ये पोलिसांकडून आरोपपत्र दाखल केले जाणार आहे त्यापैकी सहा प्रकरणात आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव सामील असल्याची माहिती आहे. फसवणूक, महिलेची छेडछाड, शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, चोरी, दंगल पसरविणे आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये हे आमदार अडकले आहेत.जानेवारी २०१४ मध्ये रेल्वे भवन आंदोलनात सहभागी झालेले मनीष सिसोदिया यांच्यावर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, तर बनावट पदवी प्रकरणात माजी कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. आमदार मनोजकुमार यांच्यावर सर्वांत गंभीर आरोप आहेत.
‘आप’च्या २१ आमदारांवर लवकरच आरोपपत्र
By admin | Published: June 18, 2015 1:46 AM