AAP-Congress: दिल्लीत आप व काँग्रेस पहिल्यांदाच एकत्र, पोलिस दलातील भ्रष्टाचारावर दोन्ही पक्ष आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 09:14 AM2023-04-22T09:14:19+5:302023-04-22T09:14:31+5:30

AAP-Congress: नायब राज्यपालांच्या विरोधात लढताना ‘आप’ला काँग्रेसची साथ मिळत नव्हती. परंतु, गेल्या काही दिवसांत झालेल्या घडामोडीनंतर नायब राज्यपालांच्या विरोधातील लढाईत आपच्या समर्थनार्थ दिल्लीतील  काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. 

AAP-Congress: AAP and Congress together for the first time in Delhi, both parties aggressive on corruption in police force | AAP-Congress: दिल्लीत आप व काँग्रेस पहिल्यांदाच एकत्र, पोलिस दलातील भ्रष्टाचारावर दोन्ही पक्ष आक्रमक

AAP-Congress: दिल्लीत आप व काँग्रेस पहिल्यांदाच एकत्र, पोलिस दलातील भ्रष्टाचारावर दोन्ही पक्ष आक्रमक

googlenewsNext

नवी दिल्ली : नायब राज्यपालांच्या विरोधात लढताना ‘आप’लाकाँग्रेसची साथ मिळत नव्हती. परंतु, गेल्या काही दिवसांत झालेल्या घडामोडीनंतर नायब राज्यपालांच्या विरोधातील लढाईत आपच्या समर्थनार्थ दिल्लीतील  काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. 
मुख्यमंत्री केजरीवाल यांना सीबीआयने समन्स पाठविल्यानंतर राजकीय गणिते बदलल्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना फोन करून काँग्रेस पक्ष आपल्यासोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.  त्यानंतर आता पुन्हा दाेन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

१५० कोटींचा घोटाळा
दिल्ली पोलिस दलातील १५० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी आप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात दिल्ली पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी १० हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यापैकी १५० कोटी रुपयांचा दुरुपयोग झाल्याचा आरोप आपने केला आहे. 

Web Title: AAP-Congress: AAP and Congress together for the first time in Delhi, both parties aggressive on corruption in police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.