'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 01:31 PM2021-06-14T13:31:54+5:302021-06-14T13:36:29+5:30

पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक; सत्ताधारी भाजपसमोर नवं आव्हान

aap to contest all 182 seats in gujarat assembly election 2022 announces cm arvind kejriwal | 'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

Next

अहमदाबाद: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला  आम आदमी पक्षाकडून आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या होमग्राऊंडवर सर्वच्या सर्व जागा लढण्याची घोषणा आपचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल सध्या अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. 

शिवसेनेनंतर आम्हीच! भाजपच्या छोट्या भावानं मागितला सत्तेत वाटा; लवकरच मोठा निर्णय होणार?

अहमदाबादमध्ये माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. गढवी शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं उपस्थित करत असतात. पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर केजरीवालांनी पत्रकारांशी संवाद साधला. '२०२२ मध्ये आपगुजरातमधील सर्व जागा लढवेल. आम्ही गुजरातला एक नवं मॉडेल देऊ. गुजरातचं मॉडेल दिल्ली मॉडेलपेक्षा वेगळं असेल. आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. त्यावरच आमचं राजकारण आधारित असेल,' असं केजरीवाल म्हणाले.

भाजपला मोठा भाऊ करणारा 'मोदींचा हनुमान' सापडला संकटात; छोटा भाऊ ५ खासदार फोडणार?

'२०२२ मध्ये आम्ही स्थानिक जनतेच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवू आणि चेहरादेखील इथलाच असेल,' अशी महत्त्वाची घोषणा केजरीवाल यांनी केली. 'भाजप आणि काँग्रेस सरकारांच्या कारस्थानांमुळे आज गुजरातची ही अवस्था आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. २७ वर्षांपासून भाजप आणि काँग्रेसची मैत्री आहे. काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. भाजपच्या गरजेनुसार काँग्रेसकडून पुरवठा केला जातो,' अशा शब्दांत केजरीवालांनी गुजरातमधील काँग्रेस, भाजपच्या राजकारणावर तोंडसुख घेतलं. 

Web Title: aap to contest all 182 seats in gujarat assembly election 2022 announces cm arvind kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.