शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 1:31 PM

पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक; सत्ताधारी भाजपसमोर नवं आव्हान

अहमदाबाद: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला  आम आदमी पक्षाकडून आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या होमग्राऊंडवर सर्वच्या सर्व जागा लढण्याची घोषणा आपचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल सध्या अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. शिवसेनेनंतर आम्हीच! भाजपच्या छोट्या भावानं मागितला सत्तेत वाटा; लवकरच मोठा निर्णय होणार?

अहमदाबादमध्ये माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. गढवी शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं उपस्थित करत असतात. पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर केजरीवालांनी पत्रकारांशी संवाद साधला. '२०२२ मध्ये आपगुजरातमधील सर्व जागा लढवेल. आम्ही गुजरातला एक नवं मॉडेल देऊ. गुजरातचं मॉडेल दिल्ली मॉडेलपेक्षा वेगळं असेल. आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. त्यावरच आमचं राजकारण आधारित असेल,' असं केजरीवाल म्हणाले.भाजपला मोठा भाऊ करणारा 'मोदींचा हनुमान' सापडला संकटात; छोटा भाऊ ५ खासदार फोडणार?

'२०२२ मध्ये आम्ही स्थानिक जनतेच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवू आणि चेहरादेखील इथलाच असेल,' अशी महत्त्वाची घोषणा केजरीवाल यांनी केली. 'भाजप आणि काँग्रेस सरकारांच्या कारस्थानांमुळे आज गुजरातची ही अवस्था आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. २७ वर्षांपासून भाजप आणि काँग्रेसची मैत्री आहे. काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. भाजपच्या गरजेनुसार काँग्रेसकडून पुरवठा केला जातो,' अशा शब्दांत केजरीवालांनी गुजरातमधील काँग्रेस, भाजपच्या राजकारणावर तोंडसुख घेतलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसGujaratगुजरात