शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

‘आप’चा देशभरात विस्तार करणार, केजरीवाल यांची विजय दर्डा यांच्या सोबत ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 3:08 AM

दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांची केजरीवाल यांनी उत्तरे दिली. सरकारच्या लोकप्रियतेचे गमक काय आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले की, आम्ही नेहमी सामान्य व्यक्तीच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले.

शीलेश शर्मा -नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमधील यशानंतर आता गोव्यासह संपूर्ण देशात विस्तार करण्याची तयारी करत आहेत. केजरीवाल यांनी आपल्या मनातील ही बाब ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना दिल्लीत आयोजित ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांगितली. (AAP to expand across the country, Kejriwal's 'Mann Ki Baat' with Vijay Darda)दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांची केजरीवाल यांनी उत्तरे दिली. सरकारच्या लोकप्रियतेचे गमक काय आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले की, आम्ही नेहमी सामान्य व्यक्तीच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. जनतेचे शिक्षण, आरोग्य, वीज-पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांना पूर्ण करण्यासाठी सरकारी आस्थापनांचा सदुपयोग केला. अगोदरच्या शासनकर्त्यांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होते. दिल्लीच्या अर्थसंकल्पातील २५ टक्के निधी शिक्षण व १५ टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. सरकारी शाळांना खासगी शाळांहून उत्कृष्ट बनविले व प्रत्येक दिल्लीकरासाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. सरकारी शाळांच्या शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षणासाठी जगातील इतर देशांमध्ये पाठ‌विले. सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे, यासाठी आयआयएम-अहमदाबादसारख्या देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्थेतून प्रशिक्षण मिळण्याचीही व्यवस्था केली. जर दुसऱ्या राज्यांतील शासनांनी लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या, तर तेही दिल्ली सरकारप्रमाणे लोकप्रिय होऊ शकतात, असे केजरीवाल यांनी सांगितले.माजी खासदार दर्डा इथेच थांबले नाहीत व त्यांनी केजरीवाल यांच्या आयुष्यातील खासगी बाबींबाबतही विचारणा केली. केजरीवाल ‘बॅड बॉयपासून गुड बॉय’ कसे झाले, अशा प्रश्न त्यांनी केला. यावर केजरीवाल यांनी हसत, मीडियानेच मला बॅड बॉय म्हणून पाहिले, असे उत्तर दिले. यावेळी केजरीवाल यांनी ‘लोकमत’ची प्रशंसा केली. आज लोकमत महाराष्ट्राचा पर्याय झाला आहे. ज्या सामान्य व्यक्तींच्या सेवाकार्यांना लोकमत शोधतो, त्यांना त्यानंतर देशभरात ओळख मिळते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे व राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खा.कुमार केतकर, श्रीनिवास पाटील, इम्तियाज जलील, सुनील मेंढे व रामदास तडस हेही उपस्थित होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीVijay Dardaविजय दर्डा