शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

फॉर्म्युला फिरवला अन् पराक्रम घडवला; 'या' पक्षानं मोदी-शहांसोबत काँग्रेसचं टेन्शन वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 3:12 PM

Aap Expansion Plan in Up after successful show in gujarat local body: मोदी-शहांच्या गुजरातमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर आता आपचं लक्ष्य उत्तर प्रदेश; केजरीवाल भाजपचं टेन्शन वाढवणार

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी गुजरातच्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका झाल्या. काल गुजरातमधील ग्राम पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागले. दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं दमदार कामगिरी केली. भाजपनं सर्वच्या सर्व ६ महापालिका जिंकल्या. तर ग्रामीण भागातही पहिला क्रमांक कायम राखला. गुजरातच्या ग्रामीण, शहरी भागांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं वर्चस्व राखलं असताना काँग्रेसचा मात्र धुव्वा उडाला. मात्र एका पक्षाच्या यशानं भाजप, काँग्रेसला धक्का दिला आहे. (AAP wins big in gujarat local body)दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष (AAP) आता हळूहळू दिल्लीच्या बाहेर विस्तार करू लागला आहे. एका बाजूला काँग्रेसची धूळधाण उडाली असताना दुसऱ्या बाजूला आपनं थेट मोदी शहांचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये धडक दिली आहे. अरविंद केजरीवालांच्या आपनं दिलेली धडक भाजपसाठी धडधड वाढवणारी ठरू शकते. गुजरातमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही आपनं शानदार कामगिरी केली आहे.गुजरातमध्ये भाजप सुस्साट, 'आप'ची एन्ट्री ठरली काँग्रेससाठी ताप; MIM कडे मतदारांची पाठफॉर्म्युला फिरवला केला अन् पराक्रम घडलाआप केवळ दिल्लीतच मर्यादित असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. मात्र आता आपनं सीमोल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. आपनं याआधी अनेकदा दिल्लीबाहेर निवडणुका लढवल्या. खुद्द केजरीवाल यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी २ लाखांच्या वर मतं घेतली. पण मोदी साडे तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. निवडणूक लढवल्यावर पक्ष मजबूत होईल, या उद्देशानं आधी आपनं निवडणुका लढवल्या होत्या. मात्र आता पक्ष मजबूत करून मग निवडणूक लढवण्यावर आपचा भर दिसत आहे.केजरीवालांची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणाररणनीती बदलली आणि नशीब पालटलंआधीच्या अनुभवांतून बोध घेत आपनं आपली रणनीती बदलली. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उतरण्याआधी पक्ष संघटना बळकट करणाऱ्या निवडणुकांकडे पक्षानं लक्ष केंद्रीत केलं. त्याचा परिणाम गुजरातमधल्या महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. सूरतसह इतर पालिकांमध्ये आपनं शानदार कामगिरी केली. मोदी-शहांना उत्तर प्रदेशात टेन्शन देणार केजरीवाल?मोदी-शहांच्या गुजरातनंतर आता आपनं योगींच्या उत्तर प्रदेशात धडक देण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आपनं राज्यात पक्षविस्तार सुरू केला आहे. योगी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी आप सोडत नाही. राज्यसभेचे खासदार संजय सिंह, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि खुद्द अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष दिलं आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीही आपनं कंबर कसली आहे.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश