शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

‘आप’ने ढवळला गोवा!

By admin | Published: May 24, 2016 2:53 AM

आम आदमी पार्टीचे राज्यभर फिरणारे कार्यकर्ते आणि पक्षप्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्याला दिलेली भेट व घेतलेल्या सभेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे.

पणजी : आम आदमी पार्टीचे राज्यभर फिरणारे कार्यकर्ते आणि पक्षप्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्याला दिलेली भेट व घेतलेल्या सभेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’चे भवितव्य काय असेल, या विषयी उत्सुकता असून पक्षाच्या सक्रियतेमुळे विरोधी पक्ष काँग्रेस व सत्ताधारी भाजपा सतर्क झाले आहेत.केजरीवाल यांची कांपाल येथील मैदानावर रविवारी प्रभावी सभा झाली. हजारो गोमंतकीय सभेसाठी व केजरीवाल यांचे भाषण ऐकण्यासाठी कांपालला आले होते, ही वस्तुस्थिती आहे. गोव्यात ‘आप’चा एकही आमदार किंवा नगराध्यक्ष किंवा जिल्हा पंचायत सदस्य नसतानाही केवळ कार्यकर्त्यांनीच गोवाभर फिरून सभेला गर्दी जमविली. काँग्रेसलाच ‘आप’कडून प्रथम धक्का दिला जाईल, असे भाजपाला व खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही वाटते. केजरीवाल यांच्या सभेला आलेल्या लोकांमध्ये दक्षिण गोव्यातील बराच ख्रिस्ती मतदार होता. ‘आप’च्या सदस्यांमध्येही गोव्यातील अनेक शिक्षित व उच्च शिक्षित ख्रिस्ती बांधव आहेत. त्यामुळे ‘आप’चा प्रभाव आणखी वाढला, तर पहिली चिंता काँग्रेसलाच करावी लागेल; मात्र आता ‘आप’चे समर्थन करणाऱ्यांपैकी बहुतेकांनी २०१२ साली भाजपाला मते दिली होती व त्यांच्यात आता अपेक्षाभंग झाल्याची भावना आहे.‘आप’ने सभेवेळी जो खर्च केला, त्याचा हिशेब द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार व उपसभापती विष्णू वाघ यांनी केली. त्यावर भाजपा सरकारने आपचा खर्च व देणग्या याबाबत चौकशी करून घ्यावी, असे आव्हान ‘आप’चे आशुतोष यांनी दिले. (खास प्रतिनिधी)केजरीवालांचे ‘भक्त’अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या विविध भागांतील लोकांच्या मनावर ‘मोहिनी’ केली आहे. त्यांची कार्यशैली, पारदर्शक व्यवहार पाहून दिल्ली व पंजाबमध्ये जसे त्यांचे भक्त तयार झाले, तशीच स्थिती गोव्यात निर्माण होत आहे. त्याची प्रचिती सोमवारी केजरीवाल यांच्या येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात सभेत आली. युवक-युवती व महिला सभेला आल्या होत्या. ...तर आत्ताच पक्ष सोडा!‘आप’मध्ये कुणाला पैसे मिळत नाहीत. लोभ, अभिलाषा किंवा तिकिटाची अपेक्षा जर कुणाला असेल, तर त्यांनी आताच पक्ष सोडावा; अन्यथा लोभी व्यक्तींच्या वाट्याला नंतर अपेक्षाभंग वाट्याला येईल, असे केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितले. गोव्यातही लोक भाजपा व काँग्रेसला कंटाळले आहेत. गोमंतकीयांनी दोन्ही पक्षांवरील निष्ठा विसरून राज्याचीसूत्रे स्वत: हाती घ्यावी. गोव्यातीलआम आदमीनेच गोव्याचा कारभार चालवावा, अशी हाक केजरीवालयांनी दिली. भाजपाला देणगीच्या रुपात ८० टक्के पैसा हा बेहिशेबी स्रोतांमधून येतो. आम्ही ‘आप’च्या देणग्या व खर्च याबाबतचा हिशेब घेऊन सार्वजनिक व्यासपीठावर येतो, भाजपानेही तसेच हिशोब घेऊन यावे.- वाल्मिकी नायक, ‘आप’चे नेते