नवी दिल्ली - पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Election) मध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विजयाकडे आगेकूच करताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC) 205 जागांवर पुढे आहे. तर भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बंगालमध्ये जल्लोशालाही सुरुवात केली आहे. यात ममतांवर शुभेच्छांचा वर्षावरही सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री सीएम अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींना एका विशेष अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. (AAP leader Arvind kejriwal congratulate to mamamta banerjee for victory in trends in west bengal )
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत ममतांना शुभेच्छा दिल्या आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले हा जमीन हलवणारा विजय आहे. यासाठी शुभेच्छा. काय सामना केला. पश्चिम बंगालच्या लोकांनाही शुभेच्छा.
ममता बॅनर्जी यांचे सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण 200 हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता. मात्र, त्यांना दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही.
पश्चिम बंगालच्या जनतेकडून 'दीदी ओ दीदी'चं उत्तर -पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय असं म्हणत अखिलेश यांनी निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये भाजप द्वेषाचे राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भाजपने एका महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचे जनतेने दिलेले उत्तर आहे. 'दीदी ओ दीदी'ला चोख प्रत्युत्तर दिले आहे" असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
ममता पुन्हा आघाडीवर - ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे. आता ममता ही आघाडी टिकवतात की सुवेंदू पुन्हा बाजी मारतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.