राजस्थान विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने तिकीट न दिल्याने निराश झालेल्या प्रेम सिंह यांनी एकदा मुलगा नापास झाला तर तुम्ही त्याला शाळेत पाठवणे बंद करता का? असा सवाल विचारला आहे. आप जोधपूरमधील 9 जागांपैकी फक्त एक जागा लढवत आहे. आपने 2018 साली जोधपूरच्या लूनी मतदारसंघातून प्रेम सिंह यांना तिकीट दिले होते, ज्यामध्ये त्यांना 898 मते मिळाली होती. त्यांनी याआधी दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली होती.
सरपंचपदाची निवडणूकही लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. प्रेम सिंह 68 वर्षांचे असून त्यांना तीन मुलं आहेत. ते मजूर म्हणून काम करतात. लूनी मतदारसंघातून ते तीनदा पराभूत झाले आहेत. पराभवानंतरही गेली पाच वर्षे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा प्रचार करत असल्याचं प्रेम सिंह सांगतात.
बिछाना सायकलवरून घेऊन ते प्रवास करतात. ते म्हणाले, पक्षाच्या हायकमांडने मला पुन्हा तिकीट देण्याचं आश्वासन दिलेलं, मात्र जोधपूर शहर वगळता पक्षाने एकही उमेदवार उभा केला नाही. आप 9 पैकी फक्त एका जागेवर निवडणूक लढवत आहे.
"मी निराश आहे कारण..."
"मी आता निराश झालो आहे कारण मला पुन्हा निवडणूक लढवायची होती आणि यावेळी मी पक्षासाठी कठोर परिश्रम केले होते. निराश असूनही मी आपचा कार्यकर्ता म्हणून राहीन आणि लोकांच्या सतत संपर्कात असेन" असं प्रेम सिंह यांनी म्हटलं आहे. वारंवार पराभूत होऊनही त्याने आपली "मोहिम" का सुरू ठेवली असे विचारलं असता, त्यांनी उत्तर दिलं की, "मुलगा नापास झाला तर तुम्ही त्याला शाळेत पाठवणार नाही का?"
जोधपूरचे आप कार्यकर्ता पंकज वाघेला म्हणाले, "प्रेम सिंह हे एक समर्पित कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाने त्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रचार करताना पाहिलं आहे. मी त्यांना लूनी मतदारसंघातील प्रत्येक गावात सायकल चालवताना पाहिलं आहे आणि ते एक लोकप्रिय चेहरा आहेत. त्यांना तिकीट मिळालं असतं पण पक्षाने यावेळी उमेदवार दिला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.