शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

बलात्काराच्या धमक्या येत आहेत- ‘आप’ खासदार स्वाती मालीवाल यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 2:00 PM

ध्रुव राठीलादेखील धरले जबाबदार, कारण काय, वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल आणि पक्षातील नेत्यांमध्ये वाद आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्यानंतर आता पक्षातील लोकांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणावर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या यु-ट्यूबर ध्रुव राठीलादेखील जबाबदार धरले आहे. 

रविवारी स्वाती मालीवाल यांनी एक्सवर पोस्ट केली की, “आपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी चारित्र्यहनन मोहीम सुरू केल्यानंतर आता मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावले जात आहे. यु-ट्यूबर ध्रुव राठीने माझ्याविरोधात एकतर्फी व्हिडीओ पोस्ट केल्यावर यात आणखी वाढ झाली आहे. माझी बाजू मांडण्यासाठी मी ध्रुव राठीला फोन केला; पण त्याने दुर्लक्ष केले. त्याच्यासारख्या स्वतंत्र पत्रकाराने ‘ आप’च्या इतर प्रवक्त्यांसारखे वागणे लज्जास्पद आहे.

हे मुद्दे मांडले...

ध्रुव राठीच्या व्हिडीओबाबत आपले मत मांडताना मालीवाल यांनी काही मुद्दे मांडले. घटना मान्य करून पक्षाने यू-टर्न घेतला. एमएलसी अहवालात हल्ल्यामुळे झालेल्या जखमा, व्हिडीओचा एक भाग प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आरोपीने फोन केला. आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी त्याला पुन्हा तिथे का जाऊ दिले? जी महिला नेहमी योग्य मुद्द्यांसाठी उभी राहिली, अगदी सुरक्षेशिवाय एकटी मणिपूरला गेली, तिला भाजप कसे विकत घेईल?, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.

मला काही झाले तर...

मालीवाल पुढे म्हणाल्या, ‘आप आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा ज्या प्रकारे मला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरून महिलांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होते. मी दिल्ली पोलिसांकडे बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची तक्रार करत आहे. गुन्हेगारांवर ते कठोर कारवाई करतील, अशी आशा आहे. मला काही झाले तर ते कोणाच्या सांगण्यावरून घडेल, हे आता आम्हाला माहीत आहे,’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्ली