Aam Adami Party: गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत असतात. यातच सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईनंतर हा वाद आणखीच वाढला आहे. तिकडे राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर विरोधक एकवटत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आपने पीएम मोदींविरोधात पोस्टर रिलीज केले आहेत.
आम आदमी पार्टीने 11 भाषांमध्ये 'मोदी हटाओ देश बचाओ'चे पोस्टर रिलीज केले आहेत. आम आदमी पार्टी 30 मार्च रोजी देशभरात 'मोदी हटाओ, देश बचाओ'चे पोस्टर लावणार आहे. दिल्लीत अशी पोस्टर्स लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर दाखल केले होते आणि 6 जणांना अटक केली होती. या घोषणेखाली 23 मार्च रोजी आम आदमी पक्षाने जंतर-मंतर येथे एक मोठी जाहीर सभा घेतली, ज्यात अरविंद केजरीवाल उपस्थित होते.
पोस्टर या भाषांमध्ये असेलया जाहीर सभेत पक्षाचे दिल्ली राज्य संयोजक गोपाल राय यांनी घोषणा केली होती की, 30 मार्च रोजी आम आदमी पार्टी देशभरात 'मोदी हटाओ देश बचाओ'चे पोस्टर लावणार आहे. हिंदी, उर्दू, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, तेलुगू, बंगाली, ओरिया, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषेत पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.