पंजाब, चंदीगडमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा करणाऱ्या आपने दिल्लीत काँग्रेसला अटींवर लोकसभेला आघाडीचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये काँग्रेसलाआपने सातपैकी एक जागा सोडली आहे. तसेच वेळेत रिप्लाय दिला तर ठीक नाहीतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असा इशाराच आपने दिला आहे.
काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, नितीशकुमार, केजरीवाल यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. या धक्क्यातून इंडिया आघाडी काही उभी राहण्याच्या परिस्थितीत नाहीय. असे असताना आता केजरीवालांनी दिल्लीत काँग्रेसला अल्टीमेटम दिले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील सपाने काँग्रेसला जागा जाहीर करून टाकल्या आहेत. याला काँग्रेसने अद्याप रिप्लाय दिलेला नाहीय. आता दिल्लीत आपने काँग्रेसला एक जागा सोडण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. आपचे नेते संदीप पाठक यांनी ही माहिती दिली आहे. आप सहा जागांवर लढणार आहे. या प्रस्तावाला जर काँग्रेसने वेळेत उत्तर नाही दिले तर आप सर्व सहा जागांवर उमेदवारांची घोषणा करेल, असा इशारा दिला आहे.
इकडे महाराष्ट्रात काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. दुसरीकडे शिवसेनेची मोठी ताकद भाजपासोबत आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील एक मोठा गट भाजपासोबत गेला आहे. यामुळे महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची आत कितीशी ताकद राहिली आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. मविआ किंवा महाराष्ट्रात इंडिया आघाडी आता नावालात राहिल्याचे दिसत आहे.