चंडीगड : पंजाबचे (Punjab) नवनियुक्त आमदार लाभसिंग उगोके (Labh Singh Ugoke) एका शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे, ते ज्या शाळेच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्या शाळेत त्यांची आई सफाई कामगार म्हणून काम करते.
'मुलगा आमदार झाला याचा खूप आनंद झाला'भदौर विधानसभा मतदारसंघात (Bhadaur Legislative Assembly) पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांचा पराभव करणारे लाभसिंग उगोके त्या शाळेचे प्रमुख पाहुणे होते. जिथे त्यांची आई बलदेव कौर (Baldev Kaur) गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहेत. बलदेव कौर म्हणाल्या की, ही अतिशय अभिमानाची बाब असून माझा मुलगा आमदार झाला याचा मला खूप आनंद आहे.
लाभसिंग उगोके यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले रिपोर्ट्सनुसार, आम आदमी पार्टीच्या (AAP) नेते लाभसिंग उगोके यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे. दरम्यान, आपल्या मुलाच्या विजयानंतर बलदेव कौर म्हणाल्या की, आम्ही नेहमीच पैसे मिळवण्यासाठी मेहनत केली आहे. माझ्या मुलाची परिस्थिती कशीही असली तरी मी शाळेत माझे कर्तव्य करत राहीन.
चन्नी यांचा 37 हजारांहून अधिक मतांनी पराभव केलामोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या लाभसिंग उगोके यांनी भदौर मतदारसंघातून चरणजित सिंग चन्नी यांचा 37,550 मतांनी पराभव केला. ते 2013 मध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले आणि पार्टीच्या रँकमध्ये झपाट्याने पुढे आले. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीने 117 सदस्यांच्या विधानसभेच्या 92 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे.