नवी दिल्ली : नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान 46 आमदारांना तिकिट देण्यात आले असून 15 आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने आज प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपचीची सत्ता कायम राहणार असल्याचा कल दर्शवला आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह विजयी होणार असून, भाजपा आणि काँग्रेसला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये केजरीवाल जरी पंसती असले तरीही मतदार आमदारांवर नाराज असल्याचे पुढे आले होते.
आज आपची यादी जाहीर झाली. यामध्ये 15 विद्यमान आमदारांना नारळ देण्यात आला आहे. तर 9 रिक्त जागांवर नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. गेल्या वेळी आपने 6 महिलांना उमेदवारी दिली होती. यंदाच्या यादीमध्ये 8 महिलांना संधी दिली आहे.
या यादीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून लढणार असून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे पतपरगंज विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत.
दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारी