लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष बहुमतापासून किंचित दूर असेल, तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये लक्षणीय स्थानी असेल, असे निष्कर्ष जनमत चाचण्यांतून समोर आले आहेत. या जनमत चाचण्या बरोबर असतील, तर ‘आप’च्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल.
यापूर्वी आपचे राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविण्याचे प्रयत्न फलदायी ठरले नाहीत. ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत आपला ५३ ते ५७, काँग्रेसला ४१ ते ४५, अकाली युतीला १४ ते १७ जागा मिळतील, असे या चाचण्यांचे म्हणणे आहे. भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या युतीला तर ठसा उमटविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल.आकडे काय सांगतात?n उत्तराखंडमध्ये ७० जागांच्या विधानसभेत भाजपला ४२ ते ४८, काँग्रेसला १२ ते १६ आणि आपला ४ ते ७ जागा मिळू शकतील.n ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपला जेमतेम निम्म्या जागा मिळतील, तर आप हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येईल, असे या चाचण्या म्हणतात.
पाच राज्यांतील निवडणुकीची घोषणा १५ जानेवारीनंतरशीलेश शर्मा n उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यातील निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग १५ जानेवारीनंतर कधीही करू शकतो. आयोगाने आपली तयारी पूर्ण केली आहे; मात्र गृह मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळालेला नाही. n गृह मंत्रालयाकडून होकार मिळताच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्नआहे. n राजकीय पक्षांनी प्रचार मोहिमेचा वेग वाढविला आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशात ‘लडकी हॅूं, लड सकती हॅूं’ ही घोषणा केली आहे. तर उत्तराखंडात ‘तीन तिगाडा, काम बिगाडा’ घोषणा देत एक व्हिडिओ गाणेही जारी केले आहे. n भाजपने तीन मुख्यमंत्री बदलले तरीही राज्याचे हाल आहेत, हे सांगण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. n पंजाबसाठीही पक्ष गाणे तयार करत आहे. सपा, भाजपाने उत्तर प्रदेशात असे व्हिडिओ यापूर्वीच जारी केले आहेत.
...तर राजकारण सोडीन -सिद्धूचंदीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली तर ५ लाख रोजगार देईन. ते नाही देऊ शकलो तर राजकारण सोडीन, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी रविवारी म्हटले. फगवारा येथे आयोजित सभेत भाजपवर टीका करताना सिद्धू म्हणाले, “विरोधी राजकीय नेत्यांना एक तर भाजपमध्ये दाखल व्हा नाही तर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला तोंड द्या, अशा धमक्या दिल्या जात आहेत.”