गाझियाबाद : भाजपाला गैरमार्गाने दिल्लीत सरकार स्थापनेपासून रोखण्यासाठी आम आदमी पार्टी(आप) काँग्रेस, जदयू तसेच भाजपातीलही काही प्रामाणिक आमदारांच्या संपर्कात असल्याचेआपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले़. भाजपा आपच्या १५ आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला़ गरज भासल्यास भाजपाचा पर्दाफाश करण्यासाठी आणखी स्टिंग आॅपरेशन उघड करू, असेही ते म्हणाले़ ते येथे पत्रकारांशी बोलत होते.पक्षाचे म्हणणे आम्ही दिल्लीत गैरमार्गाने भाजपाला सत्ता स्थापन करू देणार नाही़ यासाठी आम्ही प्रयत्न चालवले आहेत. भाजपाच्या या वाममार्गाने सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नांना विरोध असलेल्या अनेक प्रामाणिक आमदारांच्या आम्ही संपर्कात आहोत, असे ते म्हणाले़ सोमवारी केजरीवाल यांनी स्टिंग आॅपरेशनचा व्हिडिओ जारी करून भाजपा आपच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता़ (वृत्तसंस्था)
‘आप’ काँग्रेसच्या संपर्कात
By admin | Published: September 10, 2014 2:14 AM