Chief Minister Arvind Kejriwal ( Marathi News ) : काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली. याविरोधात आम आदमी पक्ष देशभरात निदर्शने करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच ईडीने ही कारवाई केली आहे. आज सीएम केजरीवाल यांना ईडी कोर्टासमोर हजर करणार आहे. आज देशभरात आप निदर्शने करणार असल्याची घोषणा आपचे नेते गोपाल राय, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. आमची लढाई रस्त्यावरुन कोर्टापर्यंत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
"आज देशात भाजप सरकारविरोधात कोण काही बोलले की लगेच त्याला अटक केले जाईल, भाजपने करोडो लोकांचा अपमान केला आहे. ही दिल्लीच्या दोन कोटी लोकांची अटक आहे. देशाच्या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्याला अटक केली आहे, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
मविआ जागावाटपाचे घोडे अडले तरी कुठे? सांगलीवरून तिढा कायम, दोन-तीन दिवसांत घोषणा
"आज सकाळी १० वाजता केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम्ही भाजपच्या मुख्यालयासमोर निदर्शने करणार आहोत, देशभरातही असे निदर्शने केली जाणार असल्याचे आपने म्हटले आहे.
" २ वर्षांच्या तपासात सीबीआय किंवा ईडीला एक पैसाही मिळाला नाही, पण निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. दोन मुख्यमंत्र्यांना अटक झाली, एका पक्षाचे खाते जप्त केले. ईडीला शस्त्र बनवून राजकारण करणे बंद करा, आमचा लढा रस्त्यावरून कोर्टापर्यंत जाणार आहे. या अटकेविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आज सकाळी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, असंही आप नेते आतिशी म्हणाले.