शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

‘आप’च्या मंत्र्यांचे ‘पदवी’पत्र बनावट

By admin | Published: April 29, 2015 12:06 AM

आम आदमी पार्टीचे (आप)आमदार आणि दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे पदवीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी केजरीवालांविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप)आमदार आणि दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे पदवीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी केजरीवालांविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला आहे. केजरीवाल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व तोमर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी केली आहे.दरम्यान, माझे प्रमाणपत्र १०० टक्के खरे असून माझ्यावरील आरोप मला व पक्षाला बदनाम करण्याचे प्रयत्न असल्याचे खुद्द तोमर यांनी म्हटले आहे. पक्षानेही त्यांचा बचाव केला आहे. तोमर २० आॅगस्टला आपले स्पष्टीकरण न्यायालयात सादर करणार आहेत. तोपर्यंत संयम राखण्याची गरज असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.जितेंद्रसिंह तोमर यांचे पदवीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा बिहारातील तिलक मांझी विद्यापीठाने दिल्ली उच्च न्यायालयासमक्ष केला आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपने मंगळवारी आम आदमी पार्टी आणि या पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांना जोरदार लक्ष्य केले. दुसऱ्यांना राजकारणाची नीतिमूल्ये शिकवणाऱ्या आम आदमी पार्टीचा बुरखा या प्रकरणानंतर टराटरा फाटला असल्याची बोचरी टीका भाजपने यानिमित्ताने केली. तोमर यांनी दिलेली पदवी बनावट आहे. कायदामंत्र्यांनी स्वत:च कायदा पायदळी तुडवला. आम आदमी पार्टीचा खरा चेहरा यामुळे लोकांसमोर आला आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना याचे उत्तर द्यावे, असे भाजप प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या.काँग्रेसने यानिमित्ताने केजरीवालांना लक्ष्य केले. केजरीवाल यांनी खरे काय माहीत असूनही त्यांनी कायदामंत्र्यांना पदावर कायम ठेवले, यामुळे केजरीवालांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तोमर यांचीही मंत्रिपदावरूनच नव्हे, तर आमदारपदावरूनही हकालपट्टी करावी, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी. चाको यांनीही दिल्लीच्या कायदामंत्र्यांची पदवी बनावट असल्याचे उघडकीस येणे केजरीवाल सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले.काय आहे प्रकरण?बिहारमधील तिलक मांझी भागलपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्याचा दावा तोमर यांनी केला होता. मात्र निवडणूक अर्जात तोमर यांनी समाविष्ट केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा खुद्द तिलक मांझी भागलपूर विद्यापीठाने दिल्ली उच्च न्यायालयासमक्ष काल सोमवारी केला होता.तोमर यांची कायद्याची पदवी बनावट असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने तिलक मांझी, भागलपूर विद्यापीठाला नोटीस जारी केली होती. या नोटीसच्या उत्तरादाखल विद्यापीठाने सोमवारी एक प्रतिज्ञापत्र न्यायालयासमक्ष सादर केले. यात तोमर यांच्या नावाचे अंतरिम प्रमाणपत्र बनावट असल्याचे आणि विद्यापीठात याची कुठलीही नोंद नसल्याचे म्हटले आहे.कोटमाझी पदवी १०० टक्के खरी आहे. विद्यापीठाच्या रेकॉर्डसोबत छेडछाड करण्यात आली आहे. न्यायालयासमक्ष मी सर्व नोंदी ठेवल्या तेव्हा आपसूकच ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल. माझ्यावरील आरोप हे मला व पक्षाला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत.- जितेंद्रसिंह तोमर, दिल्लीचे कायदामंत्री