अहमदाबाद - गुजरात निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात यावेळी आम आदमी पक्षही गुजरात निवडणुकीत उमेदवार उतरवणार आहे. आपने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून इसुदान गढवी यांना पुढे केले आहे. आगामी निवडणुकीसाठी केजरीवालांनी OTP फॉर्म्युला वापरण्यावर भर दिला आहे. या OTP फॉर्म्युल्याच्या बळावर आप निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला टक्कर देणार आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांनी OTP चा अर्थ सांगितला. ओटीपी म्हणजे ओबीसी, ट्रायबल आणि पाटीदार. आम्ही ओबीसी समुदायाला मुख्यमंत्री म्हणून पुढे आणलं आहे. आम आदमी पक्षाला ट्रायबलचं समर्थन मिळत आहे. त्याचसोबत आपचे अध्यक्ष पाटीदार समाजाचे आहेत. या तिन्ही समुदायासोबतच इतरही आमच्या बरोबर आहेत. कारण आम्ही वीज मोफत देणार आहोत ते सगळ्यांसाठी आहे. जर शाळा बनवली तर ती सगळ्यांसाठीच आहे. आमचा पक्ष कोणत्या एका जातीचा नाही. आम्ही सर्व समुदायासाठी काम करतो
गुजरातमध्ये AAP चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित झाल्यानंतर पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यावर इसुदान गढवी यांनी म्हटलं की, आम्ही सर्व अरविंद केजरीवाल यांचे सैनिक आहोत. गोपाळभाई आणि आम्ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. गोपाळभाई आमचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे असतात. परंतु गुजरातच्या जनतेला काय द्यायचे आहे हे आमच्या लक्षात आहे असं त्यांनी सांगितले.
AAP ला फक्त 3 जागा मिळण्याचा अंदाजइंडिया टीव्हीच्या या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये काँग्रेसला 59 जागांवर विजय मिळू शकतो. तर आम आदमी पार्टीला केवळ 3 जागा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक मते मिळतील, असा अंदाज आहे. एकूण मतांपैकी 52% मते भाजपला, तर 35% मते काँग्रेसला जातील. गुजरात निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागलेल्या आम आदमी पक्षाला या सर्वेक्षणानुसार केवळ 9% मतांवरच समाधान मानावे लागणार आहे.
मतदान १ व ५ डिसेंबर रोजी २ टप्प्यांत, निकाल ८ डिसेंबरला अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, हिमाचल प्रदेशसोबत ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"