गुवाहाटी : राज्यसभेचे सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर आसाम पब्लिक वर्क्स (एपीडब्ल्यू) या संघटनेचे अध्यक्ष अभिजित शर्मा यांनी स्थानिक न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला व एक कोटींच्या भरपाईची मागणी केली. गोगोई यांच्या ‘जस्टिस फॉर ए जज’ या आत्मचरित्रात आपली बदनामी करणारा मजकूर असून या पुस्तकाच्या विक्री, वितरणावर बंदी घालावी, अशी मागणी शर्मा यांनी केली.
वेटिंगवर आहात? ‘टीसी’मागे फिरावे लागणार नाही
कामरुप जिल्हा न्यायालयाने याचिकाकर्ता तसेच रंजन गोगोई, पुस्तकाचे प्रकाशक यांना समन्स जारी केले आहे. या याचिकेची पुढील सुनावणी येत्या ३ जून रोजी होणार आहे. आसाममध्ये अवैधरीत्या स्थलांतरित झालेल्यांची नावे मतदार यादीतून वगळावी, अशी याचिका सर्वप्रथम एपीडब्ल्यूने केली होती. मात्र, मला बदनाम करण्याच्या हेतूनेच ‘जस्टिस फॉर ए जज’ या पुस्तकामध्ये आसाममधील स्थितीबद्दल अयोग्य स्वरूपाचे लिखाण करण्यात आले, असा दावा शर्मा यांनी केला. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या पुस्तकात केलेल्या लिखाणामुळे माझी बदनामी झाली आहे, असेही केला. (वृत्तसंस्था)