शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

"अभिनंदनचा पाकिस्तानी लष्कराने केला अतोनात छळ, झोपूही नाही दिले"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 6:02 AM

भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याआधी पाकिस्तानी लष्कराने गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा अतोनात छळ केला.

नवी दिल्ली : भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याआधी पाकिस्तानी लष्कराने गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा अतोनात छळ केला. त्यांना झोपू दिले नाही, एका ठिकाणी डांबून ठेवले व मारहाणही केली; परंतु ते मोठ्या धैर्याने या छळाला सामोरे गेले.भारतील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पााकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला.पाकिस्तानने एफ-१६ लढाऊ विमान पाडल्यानंतर त्यांचे मिग-२१ विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी परॉशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले.>अशा स्थितीत शत्रूच्या ताब्यात सापडल्यानंतर कसे वागावे आणि शत्रूला हवी असलेली माहिती देण्याची कशा प्रकारे टाळाटाळ करावी, याचे लढाऊ वैमानिकांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार न डगमगता अभिनंदन वागले. पाकिस्तानी लष्कराच्या तीन-चार पथकांनी त्यांची कसून चौकशी केली. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी त्याची चौकशी करीत असल्याचे दिसते. पाकिस्तानच्या वायू दलाचे अधिकारीही त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करीत होते. तथापि, ते अधिक वेळ पाकिस्तानी लष्कराच्याच ताब्यात होता.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान