गाझीपूर जिल्ह्यातील खोजापूर गावात जन्मलेल्या अभिनंदन यादव यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. अभिनंदन यांचं सुरुवातीचं शिक्षण न्यू मॉडेल चिल्ड्रन स्कूल, खोजापूर येथे झाले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते बारावीसाठी कोटा येथे गेले. २०१८ मध्ये, त्यांनी आयआयटी गुवाहाटीमध्ये प्रवेश घेतला आणि २०२२ मध्ये पदवी पूर्ण केली.
सरकारी परीक्षांची तयारीही सुरू ठेवली आणि २०१७ ते २०२४ या कालावधीत १६ वेळा एसएसबी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, परंतु वैद्यकीय समस्या आणि कम्युनिकेशन स्किल चांगलं नसल्यामुळे वारंवार मुलाखतीत अपयशी ठरले. पण अभिनंदन यांनी हार मानली नाही. प्रयत्न केले. यामुळेच आज त्यांनी यूपीएससी असिस्टंट कमांडंट परीक्षेत यश संपादन केलं आहे.
२०२२ मध्ये ग्रॅज्युएशननंतर अभिनंदन यांची क्युबॅशन Cubastion Consulting Pvt Ltd, गुरुग्राममध्ये प्लेसमेंट झाली. गावात शिक्षण झाल्यामुळे त्यांचं इंग्रजी कमकुवत होतं, त्यामुळे ते वारंवार मुलाखतीत नापास झाले. पण खासगी नोकरीत त्यांनी संवाद कौशल्य सुधारलं. दिवसाचे १२ तास काम आणि रात्री अभ्यास करण्यासोबतच ते स्वावलंबी झाले आणि स्वतःचं जेवण स्वतः बनवायलाही शिकले. या अनुभवाने त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला.
अभिनंदन यादव सांगतात की त्यांनी SSB (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) परीक्षेत किमान १६ वेळा मुलाखत दिली असावी, परंतु प्रत्येक वेळी ते मुलाखतीतून बाहेर पडले. प्रत्येक वेळी ते लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. इंग्रजी बोलण्यात आलेले अपयश हे अपयशी होण्यामागचं प्रमुख कारण होतं. ग्रॅज्युएशननंतर त्यांना प्लेसमेंट मिळाल्यावर एका खासगी कंपनीत काम करत असताना त्यांचं इंग्रजी सुधारलं.
Cubastion Consulting मध्ये काम केल्याने आत्मविश्वास वाढला. त्यानंतर अभिनंदन यांना UPSC (2024) अंतर्गत असिस्टंट कमांडंटच्या परीक्षेत यश मिळालं. याआधी ते एसएससी सीजीएल अंतर्गत ऑडिटर म्हणूनही कार्यरत होते. त्यांचा हा प्रवास १६ अपयशानंतरही त्यांच्या ध्येयाकडे सतत प्रयत्न करण्याचं प्रतीक आहे. जे प्रत्येक तरुणाला प्रेरणा देतं की कठोर परिश्रम आणि समर्पणाने कोणतेही ध्येय गाठता येते.