शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अर्थव्यवस्थेत मंदीतून बाहेर पडण्याची क्षमता -मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 6:12 AM

चढउतार होतच असतात : देशाला ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवूच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याची पूर्ण क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. भारत पुन्हा एकदा उच्च आर्थिक वृद्धी प्राप्त करील, तसेच ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट प्राप्त करणेही शक्य आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

वाणिज्य व उद्योग क्षेत्रातील संघटना ‘असोचेम’च्या १00 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे. सलग सहा तिमाहींच्या घसरणीनंतर आर्थिक वृद्धीचा दर सहा वर्षांच्या नीचांकावर येऊन ४.५ टक्के झाला आहे. बेरोजगारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यावरून मोदी यांच्या सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील वक्तव्य केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीबाबत जे बोलले जात आहे, त्याबाबत मी कोणालाही दोष देणार नाही. मी टीकेतील चांगले तेवढे घेऊन पुढे जाणे पसंत करतो. यापूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संपुआ सरकारच्या काळात आर्थिक वृद्धीदर ३.५ टक्क्यांपर्यंत घसरला होता. किरकोळ महागाईचा दर ९.४ टक्क्यांपर्यंत वाढला होता. घाऊक महागाईचा दरही ५.२ टक्क्यांपर्यंत वर चढला होता. जीडीपीच्या तुलनेत राजकोषीय तूट ५.६ टक्क्यांपर्यंत वर गेली होती. तरीही मी याबाबत अकारण टीका करणार नाही. अर्थव्यवस्थेत असे चढ-उतार होतच असतात. सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यास देशाची अर्थव्यवस्था पूर्णत: समर्थ आहे.

मोदी यांनी म्हटले की, आमचे इरादे मजबूत आहेत. २0२४ पर्यंत भारताला ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त केले जाईल. हे उद्दिष्ट प्राप्त करणे शक्य आहे. उद्योगपतींनी यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी. आपण अधिक संपत्ती व रोजगारनिर्मिती करून अर्थव्यवस्थेला ५ हजार अब्ज डॉलरवर नेण्याच्या कार्यातील आपली भागीदारी निभवावी. बुद्धी, भांडवल आणि श्रम हे तीन घटक एकत्र आले तर ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सहज साध्य केले जाईल.सुधारणांची प्रक्रिया सुरूचसरकारने केलेल्या सुधारणांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, कंपनी कायद्यातील काही तरतुदी अशा होत्या की, छोट्या-छोट्या चुकांसाठीही उद्योगांना फौजदारी कारवाई सहन करावी लागत होती. आपल्या सरकारने या तरतुदींना फौजदारी श्रेणीतून हटविले. यातील सुधारणांची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आपल्या काही सूचना असल्यास जरूर सांगा.आम्ही जनतेचे एजंट : मोदी म्हणाले की, देशासाठी सगळे सहन करावे लागते. आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याचे आरोप झाले. पण मी आपणास सांगू इच्छितो की, आम्ही उद्योगपतींचे नव्हे, तर १३0 कोटी भारतीयांचे एजंट आहोत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी