नवी दिल्ली : नीट-यूजी २०२४ परीक्षा पूर्णपणे रद्द केल्यास लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताला धोका होईल. तसेच, गोपनीयतेचा भंग केल्याचा कोणताही पुरावा नसताना असा निर्णय घेणे तर्कसंगत ठरणार नाही, असे मत शिक्षण मंत्रालयाच्या संचालकांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केले आहे.
एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ५ मे रोजी आयोजित केलेली राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परीक्षा-अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे वादात सापडली. या मुद्यावरुन न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.
नीट-पीजी परीक्षा ११ ऑगस्ट रोजीयंदाची नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पात्रतेसाठी १५ ऑगस्ट ही कट ऑफ डेट निश्चित करण्यात आली आहे. ही घोषणा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ऑफ मेडिकल सायन्सेसने केली.