शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अबब... ३५0 प्रेमप्रकरणे; हैदराबादच्या तरुणाला अखेर तुरुंगाची हवा!

By admin | Published: October 19, 2016 4:50 AM

लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील कथानकाला साजेसी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

हैदराबाद : ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील कथानकाला साजेसी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यातील या ‘रिकी बहल’चे नाव आहे वेंकटरत्न रेड्डी. चित्रपटात रणवीर लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करत असे. वेंकटरत्न रेड्डी मात्र तरुणींशी लग्न करून नंतर त्यांची फसवणूक करणारा आहे.हैदराबादमधील वेंकटरत्नचा प्रवास अखेर तुरुंगात गेल्यानंतरच थांबला. हैदराबाद गुन्हे शाखेने असंख्य महिलांची फसवणूक करणाऱ्या वेंकटरत्नला अखेर अटक केली. विवाह जुळवणाऱ्या लोकप्रिय आॅनलाइन विवाह संस्थांमार्फत तो तरुणी व महिलांशी संप साधत असे. त्याने अशा पद्धतीने ३५0 हून अधिक प्रेमप्रकरणे केली. अखेर अमेरिकेतील एका कुटुंबाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातून अटक केली. तेलंगणातील फसवणुकीच्या नऊ प्रकरणांमध्ये पोलीस वेंकटचा शोध घेत होते. रेड्डीकडे अमेरिका प्रवासाचा बिझनेस व्हिसा होता. (वृत्तसंस्था)>पदवीपर्यंतही नव्हते शिक्षण...पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण न केलेल्या वेंकट रत्न रेड्डीचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्याचाच फायदा घेऊन तो महिलांना फसवत होता. मात्र इतकी प्रेमप्रकरणे होईपर्यंत त्यांचा माग प्रेमात पडलेल्या तरुणी आणि महिलांना कसा लागला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. >प्रेमशिकारी असा अडकला सावजाच्या जाळ्यात!अमेरिकेत गेल्यानंतर तो मॅट्रीमोनियल साइटवर स्वत:चे नवीन प्रोफाइल उघडायचा आणि सावज हेरायला सुरुवात करायचा. त्यातून त्याने अनेक तरुणींना भुरळ घातल्याचा अंदाज आहे. ते उघड होण्यासाठी कोणी तक्रार करते का, याची पोलीस वाट पाहत आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध एकच तक्रार आली आहे. वेंकटरत्नने एका भारतीय वंशाच्या एनआरआय मुलीबरोबर लग्न केले आणि वीस दिवसांमध्ये तिला २० लाख रुपयांना फसवले. या कुटुंबाने रेड्डीच्या विरोधात हैदराबाद पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सद्वारे वेंकटवर पाळत ठेवून, अखेर त्याला अटक केली.>पोलिसांनी रेड्डीची सोशल नेटवर्किंग साइट्सवरील प्रोफाइल तपासली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्याची ३५० मुलींबरोबर प्रेम प्रकरणे सुरु असल्याची माहिती समोर आली.