शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

अबब! जॉन्सन अँण्ड जॉन्सनला द्यावी लागणार 110 मिलिअन डॉलर्स नुकसानभरपाई

By admin | Published: May 05, 2017 5:49 PM

महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वी आपणही घ्या काळजी आणि व्हा चिंतामुक्त.

 - मयूर पठाडे

 
सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रातील जॉन्सन अँण्ड जॉन्सन ही जगप्रसिद्ध कंपनी. या कंपनीची नुसती कोट्यवधी डॉलर्सची उलाढालच नाही, पण जगभरातील र्शीमंतांपासून तर खेड्यापाड्यातल्या गरिबांपर्यंत त्यांची उत्पादनं प्रसिद्ध आहेत. मात्र या कंपनीमागील शुक्लकाष्ट काही संपत नाहीत अशी चिन्हं आहेत. अमेरिकेतील एका न्यायालयानं या कंपनीला तब्बल 110 मिलिअन अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचा आदेश नुकताच दिला आहे. वैयक्तिक प्रकरणात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खटला असल्याचं मानलं जात आहे. 
जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यानं अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील स्लेम्प नावाच्या एका महिलेला कॅन्सरला सामोरं जावं लागल्यानं ही भरपाई देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. 
केवळ अमेरिकेतच या कंपनीविरुद्ध हजारो खटले दाखल झाले आहेत. जगभरातील दाव्यांची संख्या एकत्र केली तर ही संख्या आणखीच मोठी होईल. 
 
 
स्लेम्प ही महिला गेल्या चार दशकांपासून या कंपनीची पावडर वापरत होती. स्त्रियांच्या नाजूक भागाची स्वच्छता करण्यासाठीही या पावडरचा वापर केला जातो. या पावडरमुळे स्लेम्पला अंडाशयाचा कॅन्सर झाला आणि नंतर तो यकृतातही पसरला. त्यामुळे स्लेम्पची स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. नियमितपणे केमोथेरपीलाही तिला सामोरे जावे लागते. हा निकाल लागला त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला न्यायालयातही हजर राहता आले नाही.
या पावडरमध्ये अँसबेस्टॉस आणि इतरही अनेक विषारी घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे. आपली उत्पादनं वापरल्यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो याबाबत कोणतीही कल्पना कंपनीनं आपल्या ग्राहकांना दिली नाही आणि यात 99 टक्के दोष कंपनीचाच आहे असा ठपका न्यायालयानं ठेवला आहे. याच कारणावरुन जगभरात अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिक न्यायालयात गेले आहेत. काही दाव्यांत लाखो रुपयांचा दंडही कंपनीला झालेला आहे. 
याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून जॉन्सन अँण्ड जॉन्सनची प्रतिमा खालावत असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. 
भारतातही या कंपनीच्या विरोधात ग्राहकांची मोठी ओरड आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या एका 62 वर्षीय महिलेचा भारतात गर्भाशयाच्या कॅन्सरनं मृत्यू झाला होता. या प्रकरणीही जॉन्सन अँण्ड जॉन्सनला दोषी ठरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र फूड अँण्ड ड्रग अँडमिनिस्ट्रेशननंही 2013मध्ये जॉन्सन अँण्ड जॉन्सन बेबी पावडरचे नमुने प्रयोगशाळेत चौकशीसाठी पाठवले होते आणि त्यांच्या बालप्रसाधन उत्पादनांवर बंदी घालण्यात आली होती. या पावडरमध्ये कॅन्सरप्रवण घटक असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यावर बंदी घालण्यात आली होती. 
पावडर, तेल, साबण, शाम्पू यासारखी सौंदर्यप्रसाधने तयार करणार्‍या या कंपनीच्या उत्पादनांमध्ये जिवाणूंचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त आढळून आलं होतं. ते प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी एथिलिन ऑक्साइडचा वापर करून निर्जंतुकीकरण केले. मात्र ही प्रक्रिया कॅन्सरप्रवण असल्याचं निदर्शनास आलं होतं.
कंपनी कितीही मोठी असली, तरी तिची उत्पादनं दर्जेदार असतीलच याचा धडा त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आला आहे. 
त्यामुळे सौंदर्यवर्धनासाठी घरच्याघरी केलेले आणि आपल्या ‘आजीबाईंच्या बटव्यातले’ उपचार कायमच दर्जेदार ठरतात.
 
सौंदर्यवर्धनासाठी, त्यातही नितळ त्वचेसाठी घरच्याघरी आपल्यालाही करता येतील हे उपचार.
काय कराल?
 
 
1- कापूर आणि गुलाबपाणी
गुलाबपाण्यात थोडा कापूर मिसळून कापसाच्या बोळ्यानं हे मिर्शण चेहर्‍याला लावा आणि बघा, तुमचा चेहरा चांगलाच उजळलेला दिसेल
 
 
2- मध, दूध आणि अंडं
एका बाऊलमध्ये एक चमचा मध, एक चमचा दूध आणि अंड्यातला पांढरा भाग घ्या. चांगलं ढवळून त्याचं मिर्शण करा आणि हा लेप चेहर्‍यावर पंधरा मिनिटं लावा आणि त्यानंतर गार पाण्यानं चेहरा धुवून टाका.
 
 
3- काकडी आणि दही
साधारण दोन-तीन चमचे ताजं दही घ्या. त्यात थोडी ताजी काकडी किसून मिक्स करा. हा लेप दहा मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. आरशात पाहा. काय फरक दिसतो?
4- अँपल व्हिनेगार
दोन चमचे अँपल व्हिनेगार चार चमचे डिस्टिल्ड वॉटरमध्ये चांगला मिक्स करून हे मिर्शण एका बाटलीमध्ये भरून ठेवा. कापसाच्या बोळ्यानं हे मिर्शण रोज काही वेळ चेहर्‍यावर लावा.
 
 
5- आलं आणि पुदिना
आलं आणि पुदिना एकत्र करुन चांगलं ठेचा. त्यात थोडं पाणी घाला. हा जाडसर लेप रोज चेहर्‍यावर लावा. काही दिवसांतच चेहरा तर उजळेलच, पण आपल्या त्वचेच्या तक्रारीही दूर होतील आणि चेहर्‍याला थंडावाही मिळेल.
आजीबाईच्या बटव्यातल्या अशाच करामती आपल्या लहान बाळांसाठीही वापरता येतील. त्यासाठी कोणत्याही रासायनिक सौंदर्यप्रसाधनांची गरज नाही. मात्र ही आजीबाई मात्र खरोखरच आपल्या पारंपरिक ज्ञानात निष्णात असली पाहिजे.