साक्षीदार अनुपस्थित राहल्याने कामकाज लांबणीवर विद्यापीठ अत्याचार प्रकरण : पुढील कामकाज २७ एप्रिल रोजी
By admin | Published: April 19, 2016 12:49 AM
जळगाव : साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने विद्यापीठ अत्याचार प्रकरणाचे कामकाज लांबणीवर पडले आहे. या प्रकरणाचे पुढील कामकाज आता २७ एप्रिल २०१६ रोजी होण्याची शक्यता आहे.
जळगाव : साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने विद्यापीठ अत्याचार प्रकरणाचे कामकाज लांबणीवर पडले आहे. या प्रकरणाचे पुढील कामकाज आता २७ एप्रिल २०१६ रोजी होण्याची शक्यता आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकणार्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा खटला तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुरू आहे. सोमवारी या खटल्यात सरकार पक्षातर्फे साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात येणार होती. परंतु साक्षीदार उपस्थित न राहल्याने कामकाज होऊ शकले नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता २७ एप्रिलला होणार आहे. सरकार पक्षातर्फे ॲड.गोपाळ जळमकर तर आरोपींतर्फे ॲड.अकिल इस्माइल, ॲड.सागर चित्रे व ॲड.राशीद पिंजारी हे कामकाज पाहत आहेत.