नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या संघटनेने बाजी मारली असून सुमारे तीन दशकानंतर धनंजय या दलित विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
रविवारी झालेल्या मतमोजणीत डाव्या आघाडीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोठा पराभव केला. धनंजय याला २,५९८ मते तर अभाविपच्या उमेश अजमेरा याला १,६७६ मते मिळाली. १९९६ मध्ये बत्ती लाल बिरवा याच्यानंतर धनंजय या दलित विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
या विजयानंतर धनंजय म्हणाला, ‘हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. त्यांनी द्वेष आणि तिरस्काराच्या राजकारणाला नाकारले आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास टाकला आहे. विद्यापीठाच्या आवारात मुलींची सुरक्षितता, शिष्यवृत्तीमध्ये वाढ, विविध फंड, पायाभूत सुविधा व पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जाणार आहे.’
डाव्यांच्या विजयानंतर विद्यापीठ आवारात लाल सलाम, जय भीमच्या घोषणा निनादल्या. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत ७३ टक्के मतदान झाले होते. ७,७०० पेक्षा जास्त मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले.
या डाव्या संघटना होत्या मैदानातऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए), डेमॉक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन (डीएसएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ)