चंडीगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांना कॅबिनेटमधून हटवले आहे. त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर सिंगला यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या आदेशान्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी विजय सिंगला हे आम आदमी पक्षात दाखल झाले होते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस उमेदवार सिद्धू मुसेवाला यांना ६० हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले होते.
रिपोर्टनुसार विजय सिंगला यांनी ठेका देण्यासाठी काँट्रॅक्टरकडून १ टक्का कमिशन मागितले होते. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मंत्र्याविरोधात कारवाई करताना मुख्यमंत्री मान यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी मला सांगितले होते की, एक पैशाचीही लाचखोरी आणि बेईमानी सहन करू नका. असं होणार नाही, असं वचन मी त्यांना दिले होते की, असे होणार नाही आम्ही आंदोलनातून पुढे आलेले लोक आहोत. तसेच ते आंदोलन भ्रष्टाचाराविरोधातीलच होते.
दरम्यान, विजय सिंगला यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र या घटनेनंतर पंजाबमधील विरोधी पक्ष सक्रीय झाले आहेत. तसेच त्यांनी आपच्यासरकाराविरोधात आघाडी उघडली आहे. डॉ. विजय सिंगला हे दीर्घकाळापासून मानसा रोड सिव्हिल रुग्णालयाजवळ डेंटल क्लिनिक चालवत आहेत. त्यांची पत्नी अनिता सिंगला यासुद्धा बीएएमएस आहेत. तसेच त्यांचा मुलगा चेतन सिंगला सुद्धा एमडीचे शिक्षण घेत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्यास राज्याचा भ्रष्टाचारमुक्त शासन मिळेल, तसेच जर कुणी आमदार किंवा मंत्री भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला आढळल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. उन्होंने चुनाव प्रचार के दौरान ऐलान किया था कि यदि आम आदमी पार्टी की सरकार बनती है, तो पंजाब को भ्रष्टाचार मुक्त शासन मिलेगा. अरविंद केजरीवाल ने कहा था कि उनका कोई भी विधायक या मंत्री भ्रष्टाचार में संलिप्त पाया जाएगा, तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी.