ऑनलाइन लोकमत
कोट्टायम, दि. २५ - अनेक वर्षांची प्रथा मोडीत काढत मुस्लिम महिलांनी १००० वर्षांपूर्वीच्या एका मशिदीत प्रवेश केला आहे. केरळमधील कोट्टायन जिल्ह्यात असलेल्या एका बहुचर्चित मशिदीत महिलांना जाण्यास कालपासून (दि.२४) येथील समितीकडून परवानगी देण्यात आली आहे.
मशिदीत प्रवेश करण्यासाठी अनेक वर्षांपासून महिलांनी मागणी केली होती. ही मशिद गेल्या १००० वर्षांपूर्वी असून यामध्ये कधीच महिलांनी प्रवेश केला नाही. तसेच, या मशिदीच्या वास्तूशिल्पाविषयी माहिती जाणून घेण्याची अनेक महिलांची इच्छा होती. त्या पार्श्वभूमीवर मशिदीच्या समिताने या २४ एप्रिल ते ८ मे पर्यंत या मशिदीत महिलांना प्रवेश करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे मशिदीचे समिती अध्यक्ष नवाब मुल्लादोम यांनी सांगितले. दरम्यान, या मशिदीत प्रवेशाची परवानगी दिल्यांनतर महिलांनी पारंपारिक वेषात काल प्रवेश केला.
या ऐतिहासिक मशिदीत जाण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती पूर्ण करण्याची मला संधी मिळाल्याने मला खूप आनंदी असल्याचे फातिमा या महिलेने मशिदीत प्रवेश केल्यानंतर सांगितले.