पॅराग्लायडरचा दोर तुटला आणि वेळीच पॅराशूटही उघडला नाही, जमिनीवर पडून दोघांचा मृत्यू....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 12:00 PM2021-01-21T12:00:52+5:302021-01-21T12:03:37+5:30
या घटनेमुळे येथील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि एमपीतील गोवा म्हणून लोकप्रिय असलेल्या या ठिकाणावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध हनुवंतिया जल महोत्सवात बुधवारी एका मोठा अपघात घडला ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला. हे दोन्ही एका इव्हेंट कंपनीने कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे येथील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि एमपीतील गोवा म्हणून लोकप्रिय असलेल्या या ठिकाणावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान घडली जेव्हा सनसेट इव्हेंट कंपनीचे दोन कर्मचारी पॅराग्लायडिंग करत आकाशात काही अनोख्या गोष्टी करून पर्यटकांचं मनोरंजन करत होते. अचानक बऱ्याच उंचीवर गेल्यावर ग्लायडरची दोरी तुटली आणि पॅराशूटही उघडलं नाही. त्यामुळे ते वेगाने जमिनीवर येऊन पडले.
या घटनेनंतर लोक लगेच घटनास्थळी धावत गेले. ग्लायडरमध्ये फसलेल्या दोन कर्मचाऱ्यांना मोठ्या मुश्किलीने ग्लायडरची जाळी कापून काढण्यात आलं. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला होता.
बुधवारी हनुवंतिया जल महोत्सवात पॅराग्लायडिंग दरम्यान झालेल्या या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अप्पर कलेक्टर नंदा भलावे कुशरे यांनी सांगितले की, एसडीएम पुनासा या प्रकरणाची पूर्ण चौकशी करतील.