Accident: चारधाम यात्रेवर निघालेल्या गाडीचा भीषण अपघात; औरंगाबादच्या दोघांचा मृत्यू, 13 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:40 PM2022-05-30T12:40:02+5:302022-05-30T12:40:44+5:30
Accident: गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी 100 मीटर खोल दरीत कोसळली.
उत्तरकाशी: गंगोत्री महामार्गावर कोपंगजवळ प्रवाशांनी भरलेल्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहती समोर आली आहे. कारमध्ये चालकासह 15 जण होते, त्यापैकी दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये औरंगाबादच्या दोघांचा समावेश आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, आयटीबीपीचे जवान आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
Tehri Garhwal, Uttarakhand | Six people died in a car crash on the road going from Tehri Garhwal towards Uttarkashi. All bodies were burnt. An administration team has reached the spot: District Administration
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 25, 2022
100 मीटर खोल दरीत कोसळली गाडी
सविस्तर माहिती अशी की, एका टँपो ट्रॅव्हलने 15 जण चारधाम यात्रेवर निघाले होते. रविवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास गाडी गंगोत्री धाम येथून हरसिलच्या दिशेने येत होती. गंगोत्री धामपासून 15 किमी अंतरावर असलेल्या कोपांग आयटीबीपी कॅम्पजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित होऊन 100 मीटर खोल दरीत कोसळली.
मृतांमध्ये औरंगाबादच्या दोघांचा समावेश
या अपघातात अलका एकबोटे आणि माधवन (रा.औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, उमा पाटील, अरनभ महर्षि, साक्षी सिंधे, अर्चना सिंधे, अनया महाजन, अनुप्रिया महर्षि, सई पवार, सुभाष सिंह राणा(रा. मानपूर), डॉ. वेंकेटेश, वर्षिता पाटील, आमरा एकबोटे, रजनीश सेठी व जितेंद्र सिंह(रा. प्रेमनगर देहरादून) जखमी झाले आहेत.
जखमी रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कोपांगमध्ये तैनात 35व्या आयटीबीपीने रात्री बचावकार्य सुरू केले आणि सर्व जखमींना लष्कराच्या हर्षिल रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. जखमींपैकी दोन भाविक उमा पाटील आणि आणखी एका भाविकाची प्रकृती चिंताजनक आहे. गाडीतील बहुतेक भाविक औरंगाबादचे आहेत.