गांधीनगर : पुढील वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आपली स्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेसने केलेल्या गुप्त सर्वेक्षणात राज्यात भारतीय जनता पक्षालाच बहुमत मिळेल, असे आढळून आले आहे. मात्र विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपाला ९७ जामा मिळतील, म्हणजेच भाजपाला काठावरचे बहुमत मिळेल, असे या अहवालाचा निष्कर्ष आहे. गुजरातमध्ये १८२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पटेल आंदोलन तसेच दलित अत्याचारावरून उफाळलेला हिंसाचार याचा निवडणुकीत लाभ होईल, असा काँग्रेसचा होरा आहे. राज्यातील वातावरण आपल्याला सर्वाधिक अनुकूल असल्याचे मानून काँग्रेसने व्यावसायिक संस्थांमार्फत सर्वेक्षण केले. मात्र, सर्वेक्षणाचे निष्कर्ष भाजपच्या बाजूने गेले. आगामी निवडणुकीत गुजरातेत भाजपला १८२ पैकी ९७ जागा मिळू शकतात. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. नशीब जोरावर राहिले तर ८५ जागांपर्यंत मजल मारता येईल, असे या सर्वेक्षणात आढळून आहे. हा अहवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविण्यात आला आहे.सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, १८२ विधानसभा मतदारसंघांपैकी शहरी भागातील ५२ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येण्याची १०० टक्के शक्यता असून, ४५ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता ८० ते ८५ टक्के आहे. म्हणजेच एकूण ९७ जागांवर भाजपची स्थिती मजबूत आहे. भाजप या जागा सोडून उर्वरित सर्व जागांवर पराभूत झाला तरी तो बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल. उर्वरित सर्वच्या सर्व ८५ जागा जिंकल्यानंतरही काँग्रेसला सरकार स्थापन करता येणार नाही. या अहवालात विजयाची १०० टक्के शक्यता असलेल्या जागांना ‘ए’ श्रेणींच्या जागा संबोधण्यात आले आहे. अशा जागा भाजपकडे ५२, तर काँग्रेसकडे केवळ आठ आहेत. (वृत्तसंस्था )>भाजपाच्या मतांमध्ये झालेली घटगुजरातमध्ये २0१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत ११६ जागा आणि ४७.९0 टक्के मते मिळाली होती, तर ६0 जागा मिळालेल्या काँग्रेसला ३८.९0 टक्के मते मिळाली होती. त्याआधी २00७ साली निवडणुकांत भाजपाला ११७ जागा आणि ४९.१२ टक्के मते तर काँगैसला ५९ जागा आणि ३९.६३ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच २0१२ भाजपाची कमी झालेली एक जागा भाजपाला मिळाली. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणानुसार काँग्रेसला ८५ जागा मिळाल्या, तर ती वाढ मोठी असेल.
काँग्रेसच्या सर्व्हेनुसार गुजरातेत भाजपाला बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 6:00 AM