शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

बंदूक दाखवत गुंडगिरी करणाऱ्या खासदारपुत्राचे पलायन, आशिष पांडेय नेपाळला पळाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 11:56 AM

राजधानी नवी दिल्लीतील 5 स्टार हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडेयचा पोलीस शोध घेताहेत.

लखनौ - राजधानी नवी दिल्लीतील 5 स्टार हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडेयचा पोलीस शोध घेताहेत. आशिष पांडेयच्या शोधासाठी दिल्ली पोलीस उत्तर प्रदेशच्या बस्तीकडे निघाले आहेत. मंगळवारी (16 ऑक्टोबर) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचे शेवटचे लोकेशन बस्ती येथे आढळून आले होते. आशिषनं नेपाळमध्ये पळ काढल्याचा संशय वर्तवण्यात आल्यानं नेपाळ सीमेजवळील पोलिसांना सतर्क करण्यात आले. 

दरम्यान, यापूर्वी नवी दिल्लीतील आशिषच्या फ्लॅटसहीत त्याच्या ऑफिसचीही पोलिसांनी तपासणी केली. सरोजनीनगर पोलीस दिल्ली पोलिसांच्या पथकाला घेऊन आशिषच्या दिलकुशा येथील संतुष्टि अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 301-302मध्ये घेऊन गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत आशिष आपल्या फ्लॅटमध्येच होता. मात्र पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच त्यानं तेथून पळ काढला. आशिषसंदर्भात दिल्ली पोलिसांनी त्याचा फ्लॅट सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याची जवळपास 40 मिनिटांपर्यंत चौकशी केली. शिवाय, त्यानं दिल्ली पोलिसांसोबत आशिषचा संवादही घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे.

(माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल)

 

एसटीएफ करत आहे तपासउत्तर प्रदेश एसटीएफचे एक पथक आशिष पांडेयचा शोध घेताहेत. डेप्युटी एसपी प्रमेश शुक्ला यांच्या नेतृत्वात पथक तपास करत आहे. आशिषच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांची मदत मागण्यात आली आहे.  

नेमके काय आहे प्रकरण?नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर आशिष पांडेयनं पिस्तुलाच्या जोरावर एका जोडप्याला धमकी देत शिवीगाळ केली. शनिवारी (13 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशिष पांडेय हा बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडेय यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या हातातील पिस्तुल दाखवत आशिष जोडप्याला धमकावत होता. आशिषसोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.  

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीCrime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्ली