ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार एम.एस.धोनीची पत्नी साक्षीवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, गुडगावमधील गुरुग्राममधील उद्योगपती डेनिस अरोरायांनी साक्षी मलिक आणि अन्य तीन जणांवर भा.दं.सं 420 नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेनिस अरोरायांच्या स्पोर्ट्स फिट वर्ल्ड प्राइवेट लिमिटेड या कंपनीमध्ये ह्रिती एमएसडी अलमोड प्रा. लिमिटेड या कंपनीचे शेअर्स आहेत. आणि या कंपनीच्या संचालकपदी साक्षी धोनी आहे. त्याचप्रमाणे अरुण पांडेय, शुभावती पांडेय आणि प्रतिमा पांडेय यांची मालकी देखील आहे.
फिर्यादीनुसार, साक्षी धोनीच्या कंपनीने अरोरा यांचे 11 करोड रुपयांचे शेअर्स विकत घेतले मात्र त्यांना फक्त 2.5 करोड रुपयेच दिले असल्याचे FIRमध्ये आहे. शेअर्सचे सर्व पैसे 31 मार्चपर्यंत देण्याची मुदत होती मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाहीत. त्यामुळे गुरुग्राम येथिल सुशांत लोक पुलिस स्टेशन मध्ये साक्षी आणि अन्य तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, साक्षी मलिक यांनी एक वर्षापुर्वी या कपंनीचे संचालकपद सोडल्याचा दावा केला आहे.
माझे वडिल विकास यांचे स्पोर्ट्स फिट वर्ल्ड प्रा. लिमिटेडया कंपनीमध्ये 39 टक्के शेअर्स होते. त्यावेळी साक्षी धोनी यांनी 11 करोड रुपये किंमतीचे शेअर्स खरेदी केले. पण 2.5 करोड रुपये दिल्याचे डेनिस अरोरायांचेमत आहे.