प्रसुती झालेल्या महिलेचा मृत्यू डॉक्टरांवर आरोप : धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदन
By admin | Published: February 12, 2016 10:45 PM
जळगाव: नॉर्मल प्रसूती झालेल्या सेहबाजबी रहिमखान (वय २२ रा.शाहू नगर) या विवाहितेचा शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, या मागणीमुळे पोलिसांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह धुळे येथे रवाना केला.
जळगाव: नॉर्मल प्रसूती झालेल्या सेहबाजबी रहिमखान (वय २२ रा.शाहू नगर) या विवाहितेचा शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, या मागणीमुळे पोलिसांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह धुळे येथे रवाना केला.सेहबाज यांना प्रसूतीसाठी शाहू नगरातील डॉ.नंदा जैन यांच्या तारा हॉस्पिटलमध्ये ९ फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. त्या दिवशी नॉर्मल प्रसूती होऊन त्यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोन दिवसांनी सेहबाज यांची प्रकृती खालावली. त्यामुळे गुरुवारी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांना ओम क्रिटीकल या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना दोन वाजून ३८ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. हलगर्जीपणाचा आरोपसेहबाज यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप यांनी केला. त्यांना रक्ताची गरज भासल्यानंतर दोन बाटल्या रक्त लावण्यात आले. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिघाड झाला. त्यामुळे डॉ.नंदा जैन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी ओम क्रिटीकल व जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे व सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी रात्री नातेवाईकांची समजूत काढली, परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.मृतदेह धुळे येथे रवानामृत्यू झाल्यानंतर सेहबाज यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. नातेवाईकांच्या मागणीनुसार मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह धुळे येथे पाठविण्यात आला आहे. तेथे इनकॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे निरीक्षक तांबे यांनी सांगितले.