प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपींना सक्तमजुरी
By admin | Published: February 07, 2016 12:56 AM
पुणे : तरुणाच्या तोंडावर तलवारीने वार करीत प्राणघातक हल्ला करणा-या आठ जणांना न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. आरोपींकडून येणारी दंडाची रक्कम जखमीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पुणे : तरुणाच्या तोंडावर तलवारीने वार करीत प्राणघातक हल्ला करणा-या आठ जणांना न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. आरोपींकडून येणारी दंडाची रक्कम जखमीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संतोष धोंडीराव टेमगिरे (वय 26), प्रमोद धोंडीराव टेमगिरे (वय 23), सलीममौला कुतुबुद्दीन मुलाणी (वय 21), विवेक सोपान वेलकर (वय 22), संतोष कुंडलिक कांबळे (वय 25), सतीश हनुमंत पवार (वय 22), दीपक मंगरू वालदे (वय 23) आणि विनोद सोमय्या चिनिला (वय 23, सर्वजण, रा. कोंढवा बुद्रुक) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. युसुफ हमीद सय्यद (वय 28) यांच्यावर आरोपींनी 7 मार्च 2013 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कोंढव्यातील ज्योती सोप फॅक्टरीजवळ प्राणघातक हल्ला केला होता. युसुफ आणि तौसिफ दुचाकीवरुन जात असताना आरोपींना त्यांनी शिवीगाळ केल्याचा संशय आला होता. त्यांची दुचाकी अडवत मारहाण करीत युसुफच्या तोंडावर तलवारीने वार केले होते. त्यांना तातडीने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा भाऊ तौसिफ (वय 24, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी फिर्याद दिली होती. सरकारी वकील संजय पवार यांनी दहा साक्षीदार तपासले. न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवत 3 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजारांचा दंड सुनावला.