मल्लिकार्जुन खरगे यांनी कुत्र्याशी केली कार्यकर्त्यांची तुलना; काँग्रेस नेत्यानेच दिला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 05:24 PM2024-02-05T17:24:04+5:302024-02-05T17:24:41+5:30
मल्लिकार्जुन खरगे यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही निशाणा साधला.
Acharya Pramod on Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत आयोजित न्याय संकल्प कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना पक्षातील कार्यकर्त्यांची तुलना 'कुत्र्या'शी केली. यामुळे त्यांच्याच काँग्रेस पक्षातील नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
प्रमोद कृष्णम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मल्लिकार्जुन खरगेंचा व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला. त्यांनी लिहिले - 'कार्यकर्ता हा 'कुत्रा' नसतो, तो एक मेहनती आणि धाडसी माणूस असतो. आदरणीय अध्यक्षजी, हे कटू, पण सत्य आहे.'
कार्यकर्ता “कुत्ता”
— Acharya Pramod (@AcharyaPramodk) February 5, 2024
नहीं होता, कर्मठ और “कर्मवीर”
होता है माननीय अध्यक्ष जी, बात “कड़वी”
ज़रूर है लेकिन सच है.@kharge@RahulGandhi@priyankagandhipic.twitter.com/ARCCkXLDj3
दरम्यान, काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम अनेक दिवसांपासून बंडखोरीत दिसत आहेत. ते सातत्याने काँग्रेसच्या निर्णयांवर टीका करत आहेत. मग तो राम मंदिरात न जाण्याचा निर्णय असो किंवा हिंदू धर्मावर स्टॅलिन यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया न देणे असो.
अमित मालवीय यांचीही टीका
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. ज्या पक्षाच्या अध्यक्षांना पक्षातील सर्वात सबसे मजबूत आणि महत्वपूर्ण असलेल्या “बूथ एजंट”ची कुत्र्याप्रमाणे चाचणी घ्ययाची आहे, तो पक्ष अडचणीत येणार हे निश्चित, अशी टीका त्यांनी केली.