शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

"शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे रामदेव बाबांचे शिष्य... तरीही लक्ष्य विचलित झालंच" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:14 IST

Shilpa Shetty Husband Raj kundra Arrest : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - अश्लील फिल्म बनविणे (Porn Film) आणि त्यांचे काही अ‍ॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी चौकशी अंती ही कारवाई करण्यात आली आहे. उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर सोमवारी त्यांच्याकड़े चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सोमवारी रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेच्या वृत्ताला पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुजोरा दिला आहे. 

काँग्रेसच्या एका नेत्याने यावरून आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला सणसणीत टोला लगावला आहे. "शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बाबा रामदेव यांचे शिष्य, तरीही लक्ष्य विचलित झालंच" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. आचार्य प्रमोद (Acharya Pramod) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बाबा रामदेव यांचे शिष्य आहेत. ध्यान, योग, साधना त्यांना (शिल्पा आणि राज यांना) रामदेव बाबांनीच शिकवली आहे. तरीही त्याचं लक्ष्य (ध्यान) विचलित झालंच" असं आचार्य प्रमोद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राज कुंद्राच्या अटकेनंतर "द कपिल शर्मा" शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कपिल शर्माने आपल्या कार्यक्रमात राज कुंद्राला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि बहीण शमितासोबत "द कपिल शर्मा शो" मध्ये हजेरी लावली होती.  कपिल शर्मा राज कुंद्राला म्हणतो की "तुम्ही कधी सेलिब्रिटींसोबत फूटबॉल मॅच खेळताना दिसता, कधी फ्लाईटमध्ये तर कधी शिल्पासोबत शॉपिंग करताना दिसतात. पण जरा आम्हाला देखील सांगा काही न करता तुम्ही इतके पैसे कसे कमवता?". 

"काही न करता तुम्ही इतके पैसे कसे कमवता?"; 'द कपिल शर्मा शो'मधील राज कुंद्राचा 'तो' Video तुफान व्हायरल

कपिलच्या या प्रश्नानंतर शोमध्ये सर्वच जण हसायला लागतात. शिल्पा शेट्टी आणि स्वत: राज कुंद्रा देखील यावर खूप हसतात. मात्र नंतर कपिलच्या या प्रश्नावर शिल्पाने पतीची बाजू सावरत राज कुंद्रा खूप मेहनत घेत असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असाही आरोप आहे. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजचे  व्हॉट्सअ‍ॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे.

 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीcongressकाँग्रेसBaba Ramdevरामदेव बाबाArrestअटकPoliceपोलिस