आग्रा, दि. 22- काही अज्ञात व्यक्तींनी पंधरा गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गायी आणि बैलांवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गायी, बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याचा आरोप बजरंग दलाने सोमवारी केला. एका अज्ञात व्यक्तिने गावातील पंधरा गायी-बैलांवर अॅसिड हल्ला केला, असं त्यांचं म्हणणं आहे. करमाणा आणि आसपासच्या गावांमध्ये गायी, बैलांवर हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. पण हा हल्ला नेमका कोणी केला, हे आम्हाला ओळखता आलं नाही. रविवारी, सहा गायींवर हल्ला झाला होता. आम्ही स्थानिक प्रशासनाला माहिती दिली, असं बजरंग दलाच्या आग्रा विभागाचे जिल्हा समन्वयक मुकेश गोस्वामी म्हणाले आहेत.
सध्या या जखमी गायी आणि बैलांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भादंविच्या कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी राजा सिंह यांनी सांगितलं. ज्या गायी आणि बैल अनुत्पादक म्हणून सोडून दिलं होतं, अशी प्रतिक्रिया एका स्थानिकाने दिली आहे. गेल्या काही महिन्यापासून ताजगंजमधील करभाना गावातही गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ले होत आहेत. हरियाणाच्या फरिदाबाद येथेही गायींवर अॅसिड हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. बैलांना पळवून लावण्यासाठीच हे अॅसिड हल्ले होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.