आरपीएफ पोलिसांची ८० जणांवर कारवाई
By admin | Published: December 20, 2015 12:51 AM
विशेष मोहीम : महिलांच्या डब्यातील प्रवाशी व अवैध खाद्यविक्रेत्यांचा सामावेश
विशेष मोहीम : महिलांच्या डब्यातील प्रवाशी व अवैध खाद्यविक्रेत्यांचा सामावेशजळगाव : रेल्वे प्रवासात महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे प्रवाशी व खाद्य पदार्थांची अवैध विक्री करणारे विक्रेते अशा ८० जणांवर रेल्वे सुरक्षा बलाने शनिवारी कारवाई केली. चार दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शनिवारी विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांनी ८० प्रवाश्यांवर कारवाई केली. प्रवाश्यांवर भुसावळ रेल्वे न्यायालायाने दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाई रेल्वे सुरक्षा बलातर्फे रेल्वे गाड्यांमधील वाढत्या चोरीच्या घटना पाहता चार दिवासांपासून महिलांच्या व अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारे ४५ प्रवासी, ३५ अवैध खाद्य पदार्थ विक्रेते अशा ८० जणांवर खटले दाखल करुन प्रवाशांना रेल्वे न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून सोडण्यात आले. यात चार तृतीय पंथी प्रवाशांचा सामवेश होता.नियम मोडणार्यांवर कारवाईनियम मोडणार्या प्रवाशांवर बलातर्फे आपल्या कार्यक्षेत्रात चार दिवसांपासून नियम मोडणार्या प्रवाशांवर धडक कारवाई करण्यात येत असल्याने अशा प्रवाशांचे धाबे दणाणले आहे. कारवाई सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले या गाड्यांमध्ये कारवाईशनिवारी बलातर्फे १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर काशी एक्सप्रेस, १२८५९- हावङा -मुंबई गितांजली एक्सप्रेस, १२७७९ वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस या डाऊन तर अप १५०१८ -लो.टि.ट. -गोरखपूर काशी एक्सप्रेस या गाड्यांमध्ये कारवाई करण्यात आली.ही कारवाई सुरक्षा बलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. पी. यादव, हेड कॉन्स्टेबल अकबर खान, नीलेश अटवाल, पी. एम. पाटील, काँ.आर.डी.चव्हाण यांच्या सह सहकार्यांनी केली.