गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियामध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे घक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते, यावर आता DGCA ने मोठी कारवाई केली आहे. एअर इंडियावर ३० लाख रुपयांचा दंड तसेच पायटचे ३ महिन्यांसाठी लायसन्स सस्पेंड करण्यात आले आहे.
डीजीसीएने ही कारवाई आज शुक्रवारी केली आहे. पायलटवरती ही कारवाई विमान नियम १९३७ नियमनुसार १४१ आणि DGCA च्या नागरिक उड्डाण नियमांनुसार करण्यात आली आहे. याशिवाय एअर इंडियाच्या उड्डाण सेवेतील संचालकाला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणात पीडित महिलेने एअर इंडियावर कारवाई न केल्याचा आरोप केला आहे, त्यानंतर डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली. ' तुमच्यावर कारवाई का करू नये. तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडली नाही, पण तरीही न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करता तुम्हाला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला जाईल, असं डीजीसीएने एअर इंडियाला म्हटले होते.
BREAKING: माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात, डॉ. दीपक सावंत जखमी; कारला डंपरची धडक
दिल्ली पोलिसांनी कारवाई करत लघुशंका करणाऱ्या आरोपीला बंगळुरु येथून ताब्यात घेतले. शंकर मिश्रा असं आरोपीचे नाव आहे. बिझनेस क्लास मध्ये बसलेल्या ७० वर्षाच्या महिलेवर लघुशंका केल्याचा आरोप मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या 42 दिवसांनंतर आरोपीला अटक झाली. मुंबईचा रहिवासी असलेला शंकर मिश्रा फरार होता, त्यानंतर त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे अटक केली.पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि 354,294,509,510 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.