विधानसभेत हेडफोन फेकून मारणाऱ्या काँग्रेसच्या ११ आमदारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 06:14 PM2018-03-13T18:14:21+5:302018-03-13T18:31:24+5:30
सभागृहात गोंधळ घालणारे लोकनियुक्त सभासद ही आता सार्वत्रिक समस्याच बनली आहे. सभागृहात गोंधळ घालून हेडफोन फेकून मारल्या प्रकरणी काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे...
हैदराबाद - सभागृहात गोंधळ घालणारे लोकनियुक्त सभासद ही आता सार्वत्रिक समस्याच बनली आहे. सभागृहात गोंधळ घालून हेडफोन फेकून मारल्या प्रकरणी काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी तेलंगाणाच्या विधानसभेत घडला आहे. विरोधी पक्षनेते जना रेड्डी आणि तेलंगाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांच्यासह अन्य नऊ आमदारांचा निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. विधानसभेचे हे अधिवेशन संपेपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे.
सोमवारी विधानसभेमध्ये राज्यपालांचे अभिभाषण सुरू होती. त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. काहींनी तर राज्यपालांच्या भाषणाच्या प्रती पोडियमच्या दिशेने फेकल्या. यादरम्यान काँग्रेसचे एक आमदार वेंकट रेड्डी यांनी राज्यपालांना लक्ष्य करून हेडफोन फेकले. त्यातील एक कौन्सिल चेअरमन गौड यांना लागला. मात्र आपण हे कृत्य जाणून बुजून केलेले नाही, असा दावा रेड्डी यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी तेलंगाणाच्या विधानसभेत घडला आहे. विरोधी पक्षनेते जना रेड्डी आणि तेलंगाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांच्यासह 9 आमदारांना निलंबित केले. अध्यक्षांनी या आमदारांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर संतापलेलेल्या आमदारांनी विधानसभेबाहेर धरणे धरले.
या आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईचे सत्तारुढ तेलंगाणा राज्य समिती आणि एमआयएमने समर्थन केले आहे. तर भाजपा नेते जी. किशन रेड्डी यांनी या कारवाईला विरोध केला आहे.